केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने १ एप्रिल २०१९ पासून वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बसविणे अनिवार्य केले होते. हा एक प्रकारचा बारकोड असून, तो केंद्रीय मंत्रालयाच्या ‘वाहन’ प्रणालीशी जोडलेला आहे. त्यावरील कोड स्कॅन केल्यानंतर वाहनाची सगळी माहिती मिळते.
वाहनाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी होऊन आता पावणेदोन वर्षे झाली असली, तरी रस्त्यावर धावणाऱ्या अनेक वाहनांवर आजही ‘हाय सिक्योरिटी नंबर प्लेट’ नसल्याचेच दिसते. ही नंबर प्लेट का गरजेची आहे, ती कशी लावायची, याबाबत जाणून घेऊ या..!
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर होलोग्राम स्टिकर असतो. त्यावर वाहनाचे इंजिन व चेसी नंबर असतो. वाहनाची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन ही नंबर प्लेट तयार केली आहे. हा नंबर प्रेशर मशीनने लिहिला जातो.
ही कामे होणार नाहीत..
वाहनाच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकेंड कॉपी
वाहनाचं रजिस्ट्रेशन ट्रान्सफर
अॅड्रेस चेंज
रजिस्ट्रेशन रिन्यूवेशन
नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट
हायपोथॅकेशन कॅन्सेलेशन
हायपोथॅकेशन एंडोर्समेंट
नवं परमिट
टेम्पररी परमिट
स्पेशल परमिट
नॅशनल परमिट
नोंदणीसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
वाहनावर ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ लावण्यासाठी दोन पोर्टल आहेत. त्यावर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येईल. त्यासाठी bookmyhsrp.com/index.aspx वेबसाईटवर जा. नंतर सार्वजनिक वा खासगी वाहनाशी जोडलेला एक पर्याय निवडा.
खासगी व्हेईकल टॅबवर क्लिक केल्यास पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक, सीएनजी (CNG) आणि CNG+पेट्रोल यापैकी पर्याय निवडा. पेट्रोल टाईप टॅबवर क्लिक केल्यावर वाहनांची कॅटेगरी खुली होईल. त्यात बाईक, कार, स्कूटर, ऑटो असे पर्याय असतील. त्यात काही माहिती भरावी लागेल.
गाडीवर रजिस्ट्रेशन प्लेट असेल आणि केवळ स्टिकर लावायचा असल्यास, www.bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन माहिती भरावी लागेल.
इंधनानुसार गाडीवर रंगीत स्टिकर
दूरुनच वाहनांची ओळख पटावी, यासाठी वाहनांवर वेगवेगळ्या रंगातील स्टिकर बसविण्यात येतात. त्यात पेट्रोल, सीएनजी वाहनांसाठी हलक्या निळ्या रंगाचा स्टिकर आहे, तर डिझेल गाड्यांसाठी नारंगी स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
आता कारवाईचा बडगा
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार परिवहन विभागाने वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट, इंधनानुसार रंगीत स्टिकर लावणं अनिवार्य केलंय. मात्र, वाहनधारकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने परिवहन विभागाने आता कारवाईची दंडूका उचलला आहे. सुरुवातीला चारचाकी वाहनधारक रडारवर असल्याचे सांगण्यात येते.