SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ बँकांचे चेकबुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार; तुमचेही बँकेत खाते असेल, तर काय करायचं? वाचा..

बँकांच्या विलनीकरणानंतर (Bank Merger) आता चेकबुकबाबतही नियम बदलले आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या तीन बँकांचे चेकबुक चालणार नाहीत आणि एमआयसीआर (MICR) कोड, IFSC कोडही अवैध (Invalid) होणार आहेत.

आता नवं चेकबुक घ्यावं लागणार…

Advertisement

पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करून सांगितले की, “ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक 1 ऑक्टोबर 2021 पासून बंद होतील. कृपया दोन्ही बँकांची जुनी चेकबुक पंजाब नॅशनल बँकेत घेऊन जाऊन नवीन चेकबुक घ्यावे”, असं सांगितलं आहे.

ग्राहक नवीन चेकबुकसाठी एटीएम, इंटरनेट बँकिंग किंवा पीएनबी वनद्वारे अर्ज करू शकतात. ग्राहक जवळच्या ब्रँच किंवा PNB ONE App वरुनही चेकबुकसाठी अर्ज करू शकतात. तसेच PNB टोल फ्री नंबर 1800-180-2222 वर कॉल करुन नव्या चेकबुकच्या संबंधित समस्यांचं निराकरण करू शकतात.

Advertisement

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) या दोन बँका पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मर्ज झाल्या आहेत.

इंडियन बँकेनेही अलीकडेच एका ट्वीटमध्ये माहिती दिली होती की, अलाहाबाद बँकेचे पूर्वीचे MICR कोड आणि चेकबुक 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वैध असतील. कोणत्याही व्यत्ययाशिवाय बँकिंग व्यवहार सुरू ठेवण्यासाठी, ग्राहकांना 1 ऑक्टोबर 2021 च्या अगोदर नवीन चेकबुक घ्यावे लागणार आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement