SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत आरोग्य मंत्री टोपे यांचे सूचक वक्तव्य, ते नेमकं काय म्हणाले, वाचा..!

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्य सरकारने बहुतांश आस्थापने, बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, मंदिरे अजूनही कुलुपबंद आहेत. त्यावरुन विरोधी पक्ष सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करीत आहेत. आंदोलने करीत आहेत.

राज्यातील जनतेलाही ही देवालये कधी उघडणार, असा प्रश्न पडला आहे. माध्यमेही सातत्याने सरकारला हा प्रश्न विचारत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री यांनाही नुकताच हा प्रश्न विचारण्यात आला होता.

Advertisement

मंदिरे उघडण्याबाबत स्पष्ट संकेत देताना, मंत्री टोपे म्हणाले, की दसरा वा दिवाळीनंतर मंदिरं उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख, या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच हा निर्णय घेणार आहेत.

सध्या गौरी गणपती सुरू असून, दसरा-दिवाळीचा सणही तोंडावर आलाय. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यास, कोरोनाचा धोका आटोक्यात आल्यास दसरा-दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा खुली केली जाऊ शकतात, असा सूचक वक्तव्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

Advertisement

साकीनाका घटना माणुसकीला काळिमा फासणारी
मुंबईतील साकीनाका परिसरातील अत्याचार व हत्येच्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, की ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कायद्याचा जरब आवश्यक आहे.

‘महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या शक्ती कायद्याबाबत काही सूचना आल्या होत्या. त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली असून, लवकरच या कायद्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात गृह विभाग आणि मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचेही टोपेे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, की सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कोरोनाच प्रसार होऊ शकतो. त्यामुळे टास्कफोर्सच्या बैठकीतच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले होते.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement