SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पाचवी टेस्ट रद्द केल्याने इंग्लडच्या खेळाडूंनी असा घेतला बदला, बीसीसीआयला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न..!

टीम इंडियावर कोरोनाचे संकट कोसळल्याने इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. हा सामना रद्द झाल्याने इंग्लड क्रिकेट बोर्डाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

इंग्लंड संघासाठी पाचवी कसोटी फार महत्वाची होती. कारण, या कसोटी मालिकेत भारत २-१ असा पुढे होता. पाचवी कसोटी जिंकून त्यांना मालिकेत २-२ अशी बरोबरी करण्याची संधी होती, पण हा सामना रद्द झाल्याने इंग्लंडचे खेळाडू चांगलेच भडकले आहेत.

Advertisement

इंग्लंडच्या खेळाडूंनी आता या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयला खिंडीत पकडण्यासाठी या खेळाडूंनी मोठा निर्णय घेतलाय. इंग्लंडचे जॉनी बेअरस्टो, डेव्हिड मलान आणि ख्रिस वोक्स यांनी आगामी आयपीएलमधून माघार घेतली आहे.

आयपीएलमधून माघार
आयपीएलमधील संघांसाठी हे तिन्ही खेळाडू महत्वाचे आहेत; पण भारताने पाचवा कसोटी सामना रद्द केल्याचा राग त्यांनी असा काढला आहे. बेअरस्टो, वोक्स आणि मलान यांनी आपण आयपीएलमधून माघार घेत असल्याचे जाहीर केलेय.

Advertisement

दरम्यान, यापूर्वी इंग्लंडचा यष्टीरक्षक जोस बटलर यानेही यंदा आयपीएल खेळणार नसल्याचे म्हटले होते. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स तर बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. त्याची इंग्लडच्या टी-२० वर्ल्ड कपसाठीही निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे तोही आयपीएलमध्ये खेळणार नाही.

सध्या तरी इंग्लंडचे सॅम करन आणि मोइन अली हेच खेळाडू राहिले असून, ते आयपीएलबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोघांनीही आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्यास इंग्लंडने आयपीएलवर बंदी घालण्यासारखे चित्र दिसेल. त्यामुळे त्याच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

इंग्लंडप्रमाणेच अन्य देशांच्या खेळाडूंनी आयपीएलवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यास बीसीसीआयची कोंडी होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे खेळाडूंच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

इंग्लंडच्या खेळाडूंनाही फटका
दरम्यान, आयपीएलमध्ये न खेळण्याचा फटका इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसू शकतो. कारण, आयपीएल खेळण्यासाठी कमी कालावधीत या खेळाडूंना मोठी रक्कम मिळते. या रकमेवर इंग्लंडच्या खेळाडूंना पाणी सोडावे लागेल. त्यात इंग्लंडच्या खेळाडूंचेही मोठे नुकसान होणार आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement