SpreadIt News | Digital Newspaper

टू व्हीलर घेण्याच्या विचारात आहात? मग लॉंच झालेल्या होंडाच्या ‘या’ शानदार बाईकविषयी नक्की वाचा..

0

होंडा कंपनीने (Honda) गेल्या महिन्याच्या अखेरीस 180- 200 सीसी मोटरसायकल क्षेत्रात नवा ट्रेंड प्रस्थापित करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने New Honda CB200X भारतीय बाजारात 1.44 लाख रुपये (एक्स-शोरूम) या किंमतीसह लाँच केली आहे. ही नवीन मोटरसायकल हॉर्नेट 2.0 वर आधारित आहे.

Honda ADV च्या मध्यभागी 184 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे. या बाईकमधील इंजिन 8500rpm वर 17.03bhp ची पॉवर आणि 6000 rpm वर 16.1Nm चा टॉर्क जनरेट करतं. या बाईकमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हिल्सही देण्यात आलेत आहेत. 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Advertisement

बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर 2021 पासून सुरू

Honda CB200X ची बुकिंग आधीपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सुरु झाली आहे. आता ग्राहक 2000 रुपये भरून ही बाईक बुक करु शकतात. या बाईकची डिलिव्हरी सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे.

Advertisement

Honda CB200X ची (व इतर होंडाच्या उपलब्ध दुचाकींची) बुकिंग करण्यासाठी क्लिक करा 👉 https://www.honda2wheelersindia.com/CB200X

Honda CB200X बद्दल काही खास गोष्टी..

Advertisement

नवीन होंडा CB200X चा एलईडी लायटिंग सेटअप (एलईडी हेडलॅम्प पोझिशन लॅम्प, एलईडी विंकर्स आणि प्रसिद्ध एक्स- काराचे एलईडी टेल लॅम्प) अंधाऱ्या वळणांवर योग्य वाट दाखवण्यास मदत करतो. शिवाय प्रखर प्रकाश कमी उजेड असलेल्या कोणत्याही वातावरणात फायदेशीर ठरतो.

मोटरसायकल पूर्णपणे डिजिटल लिक्विड क्रिस्टल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसह येते. इतर प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये इंजिन स्टॉप स्विच, हॅझर्ड स्विच, स्प्लिट सीट, एक्झॉस्ट, अंडर काउल आणि सिंगल-चॅनेल एबीएस यांचा समावेश आहे. होंडाची CB200X हिरो X Pulse आणि रॉयल एनफिल्ड हिमालयांसारख्या बाइकशी स्पर्धा असेल.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement