SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बस्स झालं! आता ‘त्यांना’ ऑफिसवर कामाला बोलवा; कर्मचाऱ्याच्या पत्नीनं थेट बॉसला धाडलं पत्र..

देशातील उद्योगपती हर्ष गोएंका यांनी ट्विटर अकाऊंटवर अलीकडे एक पोस्ट शेअर केली आहे. आता ही पोस्ट वाचताना तुम्हाला हसू येणार नाही असं होणार नाही. ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून यावरून लोकांचे दोन गट झाले आहेत. त्यांचा कमेंट्सचा वर्षाव चालूच आहे. कोणी याकडे सिरीयस तर कोणी गंमत म्हणून पाहत आहे.

एका कर्मचाऱ्याच्या या पत्नीनं आपल्या पतीबद्दल तक्रार केल्याचा मेसेज हर्ष गोएंका यांनी शेअर केला आहे. यावर हर्ष गोएंका यांनी लिहिलंय की, “यांना कसे उत्तर द्यायचे ते मला माहीत नाही…” ही पोस्ट वाचली की, काही लोकांनी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या बायकोची स्थिती समजून घेतली आहे, तर अनेकांचे मत आहे की, घरातून काम संपू नये.

Advertisement

पत्रात पतीविषयी तक्रारींचा पाऊस, वाचा पत्र.. https://www.instagram.com/p/CTrE78EMK4v/?utm_medium=copy_link

पत्नीच्या तक्रारीचे पत्र – “महोदय, मी तुमचे कर्मचारी मनोज यांची पत्नी आहे. कृपया तुम्ही त्यांना आता कार्यालयामधून काम करण्याची संमती द्यावी, असं नम्र आवाहन करते. माझ्या पतीने कोरोना लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत आणि ते ऑफिसमधील सर्व कोरोनाविषयक प्रोटोकॉलचं पालन करतील. असंच जर त्यांचं नेहमी घरून काम (WFH) अजून काही वेळ चालू राहिलं तर आमचं लग्न मोडणार हे नक्कीच! कारण तो दिवसातून दहा-दहा वेळा तर कॉफीच पितो आणि या खोलीतून त्या खोलीत बसण्यासाठी ये-जा करत असतो. पण तिथंही तो काही न काही गडबड करत असतो आणि हे ना ते सतत खाण्यासाठी मागत असतो. मी त्याला कामादरम्यान झोपलेलेसुद्धा पाहिले आहे. मला आधीच दोन मुलांची काळजी घ्यावी लागते (आणि आता आणखी त्यात ही भर!) त्यामुळे मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे”, असं ती पत्रात म्हटली.

Advertisement

हर्ष गोएंका यांनी नेटिझन्सच्या प्रश्नांची उत्तरेही दिली आहेत. एकानं लिहिलंय की, ‘पुरे झाले, त्याला आता कामावर परत बोलवा.’ दुसर्‍या एकानं लिहिलंय की, ‘ती व्यक्ती तुम्ही असता तर तुम्ही काय केले असते ते आम्हाला सांगा?’ यासह अनेकांनी यावर वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement