SpreadIt News | Digital Newspaper

धक्कादायक! तालिबानने अफगाणिस्तानच्या माजी उपराष्ट्रपतींच्या भावाची गळा कापून केली हत्त्या आणि मग…

तालिबानी पंजशीर खोरे ताब्यात घेण्यासाठी अधिकच आक्रमक झाले असून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (Amarullah Saleh) यांच्या भावाची तालिबाननं निर्घृण हत्या केली आहे. काही दिवसांपूर्वी आपणच अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष असल्याचं अमरुल्लाह सालेह यांनी जाहीर केलं होतं.

नेमकं काय घडलं?

Advertisement

सध्या पंजशीर व्हॅलीत (Panjshir valley) तालिबानी आणि एनआरएफ यांच्यात तुंबळ युद्ध सुरु असून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे भाऊ रोहुल्लाह सालेह ज्या ठिकाणी तळ ठोकून लढत होते तिथे तालिबानचे दहशतवादी पोहोचले. या दहशतवाद्यांनी घेराव घालून रोहुल्लाह सालेह यांची कोंडी केली. ओळख पटविल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी रोहुल्लाह सालेह यांचा प्रचंड शारीरिक छळ केला. या छळामुळे रोहुल्लाह सालेह (Rohullah Saleh Murder) यांचा मृत्यू झाला आहे.

तालिबानच्या तावडीत सापडले असता तालिबानने त्यांची अत्यंत निर्दयीपणे चाबकाचे फटके मारून गळा चिरून हत्या केली. वीजेच्या तारांनी सपासप मारहाण करुन गळा कापला होता आणि त्यानंतर त्यांच्यावर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. असंही म्हटलं जातं आहे की, त्यांना फासावर लटकवले गेले होते. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांवरही तालिबानचा गोळीबार सुरू असून आत्तापर्यंत 4 जण मृत्यू पावले आहेत.

Advertisement

दरम्यान पंजशीरमधून अमरुल्ला सालेह तालिबानविरोधातील लढ्यात सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांचे भाऊ रोहुल्लाह सालेह यांची तालिबानकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानकडून सालेह यांच्या बहिणीचीदेखील अमानूष हत्या करण्यात आली होती. अहमद मसूद आणि अमरुल्ला सालेह तालिबानने पंजशीरचा ताबा मिळवल्यानंतर देश सोडून ताजिकिस्तानला पळून गेल्याचा दावा आहे. मात्र ताजिकिस्तानमधीस अफगाणिस्तान सरकारच्या राजदूतांनी हा दावा फेटाळला आहे.

‘ती’ लायब्ररी चर्चेत!

Advertisement

काही दिवसांपूर्वी माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पंजशीरमधल्या एका लायब्ररीत बसून एक व्हिडीओ जारी केला होता. आता तिच लायब्ररी पुन्हा चर्चेत आली आहे.
तालिबान्यांनी अमरुल्ला सालेह हे जिथे राहत होते तेथील ग्रंथालय ताब्यात घेतल्याच्या दाव्यासह खुर्चीवर बसलेला एक फोटो सोशल मीडियावर जारी केला आहे.

अहमद मसूदच्या नेतृत्वात नॅशनल रेझिस्टंस फोर्स (NRF) लढत आहे. पंजशीरचे शेर म्हणून अहमद मसूदला ओळखलं जातं. 1996 साली जेव्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला होता तेव्हा पंजशीर मात्र त्यांना जिंकता आलं नव्हतं. यावेळेस आता पंजशीरच्या काही भागात तालिबानी घुसले असल्याचं चित्र दिसतंय. आता तालिबानला पाकिस्तानची मदत मिळाल्याने ते हळूहळू पंजशीरच्या बाजूने पुढे-पुढे जात आहेत, अशीही माहीती पसरत आहे. याचा परिणाम या परीस्थितीत जिहादी कारवाया केवळ जम्मू -काश्मीरमध्येच नव्हे तर दक्षिण आशियातील इतर भागातही वाढू शकतात. यामध्ये बांगलादेश, मालदीव, श्रीलंका सारख्या देशांचाही समावेश आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement