SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

व्हॉट्सॲप ‘हे’ 6 धम्माल फीचर्स आणणार; कोणते नवीन बदल होणार, ते जाणून घ्या..

फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सॲपचा वापर IOS आणि Android या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टीमच्या वापरकर्त्यांकडून केला जातो आणि त्यामुळे हे अपडेट्स दोघांसाठीही रिलीज केले जात आहेत. WABetaInfo नावाच्या वेबसाईटने व्हॉट्सॲपवर आणत असलेल्या सर्व फिचर्सची यादी (Six new WhatsApp features) प्रसिद्ध केली आहे.

Whatsapp चे आगामी 6 नवीन फीचर्स:

Advertisement

▪️ चॅट बबलच्या डिझाईनमध्ये बदल:

अनेक मीडियामधील दाव्यांनुसार व्हॉट्सअ‍ॅप आपल्या चॅट बबल्सचे डिझाईन बदलत आहे. चॅट बबलसाठी नवीन डिझाइन अँड्रॉइड युझर्ससाठी नवीन चॅट बबल (Chat Bubble) फीचरचे टेस्टिंग केलं जात असून, WABetaInfo च्या माहितीनुसार, आता चॅट बबल मोठे आणि हिरव्या रंगात असतील.

Advertisement

▪️ व्हॉईस मेसेजसाठी नवीन इंटरफेस:

व्हॉईस मेसेजला (Voice Message) नवीन इंटरफेस (New Interface) देण्यात आलं असून, आता युझर्स व्हॉईस मेसेज पाठवण्यापूर्वी तो ऐकू शकतील आणि नको असल्यास तो डिलिटसुद्धा करू शकतील.

Advertisement

▪️ कॉन्टॅक्ट्स कार्ड:

नवीन अपडेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जे कॉन्टॅक्ट्सच्या माहितीसाठी वापरले जाणारे info button आहे, ते कॉन्टॅक्ट्सची (Contacts) माहिती देणारं बटण कॉन्टॅक्टच्या नावापुढे दिसेल. तसेच प्रोफाईल फोटो आता स्क्वेअर बॉक्समध्ये दिसणार नाही.

Advertisement

▪️ व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट शॉर्टकट (Whatsapp Payment Shortcut):

अँड्रॉइड युझर्सना व्हॉट्सअ‍ॅपच्या पेमेंट ऑप्शनचा शॉर्टकट आता चॅट बारमध्येही (Chat Bar) दिसेल. हा शॉर्टकट एक अतिरिक्त फीचर्स असेल, अर्थात सध्याचा पेमेंट पर्याय न बदलता हे फिचर देण्यात येणार आहे.

Advertisement

▪️ मेसेज रिॲक्शन (Message Reactions):

इन्स्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे, युजर्स आता व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करताना त्याच्यावर इमोजीसोबत रिॲक्शन देऊ शकतील. मॅसेजच्या खाली इमोजींची यादी दिसेल. जर तुमचे किंवा समोरील व्यक्तीचे ॲप अपडेट केलेले नसेल आणि तुम्हाला मेसेज रिअ‍ॅक्शन फीचर वापरायचं किंवा पाहायचं असेल तर तुम्हाला अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

Advertisement

▪️ फोटो एडिटिंग टूल्स (Photo Editing Tools):

व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेअर करण्याचे प्रमाण मोठे आहे . ‘ड्रॉइंग टूल्स’ (Drawing Tools) नावाचे नवीन अपडेट दिसेल जे फोटो एडिट करण्यात मदत करणार आहे. आता तुम्ही या एडिटेड फोटोंवर स्टिकर्सही जोडू शकणार आहे.

Advertisement

व्हॉट्सॲपच्या अपडेटमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्याची युजर्स बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत. आता यासारखे बहुतेक अपडेट्स व्हॉट्सअपने यूजर्ससाठी जारी केले आहेत, काही असेही आहे जे सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहेत. आता व्हॉट्सअप ते यूजर्ससाठी लवकरच जारी करणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement