SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनावर लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर? सुप्रीम कोर्टाने त्या याचिकेवर दिलं ‘हे’ उत्तर..

कोरोनावर उपचारासाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. या आजारावर कोणी आयुर्वेदिक तर कोणी गावठी असे काही उपाय सुचिवले. अशात आता एका पारंपारिक उपचारासाठी कोरोनावार परवानगी हवी, म्हणून एकाची भर पडली आहे.

वाचून तुम्हालाही कदाचित आश्चर्य वाटेल की, तो पारंपारिक उपचार म्हणजे ‘लाल मुंग्यांची चटणी’ (Red ant chutney for corona treatment) आहे. कोरोनावरील उपचारासाठी लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर करण्याची परवानगी द्यावी, अशी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुप्रिम कोर्टाने (Supreme court) फेटाळाली आहे.

Advertisement

दावा खरा की खोटा?

ओडिशातील आदिवासी समाजाचे सदस्य नायधर पाढीयाल यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला त्यांनी ओडिशा हायकोर्टात याचिका दाखल केली. लाल मुंग्यांच्या चटणीचा वापर कोविड-19 विषाणूवर केला जाऊ शकतो, असा दावा काही जण करीत आहेत. हा दावा खरा की खोटा हे तपासण्यासाठी आयुष मंत्रालयाने यासंबंधी संशोधन करावं, हा आदेश हायकोर्टाने दिला होता.

Advertisement

सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, ‘कोरोनावर अशा पारंपारिक उपचाराला परवानगी देऊ शकत नाही. देशात कित्येक पारंपारिक उपचार आहेत. आपल्या घरातही आपण काही पारंपारिक उपचार छोट्या आजारांवर करत असतो; पण त्याचे परिणाम चांगले असू शकतात वा वाईट हे स्वतःला भोगावे लागतात. संपूर्ण देशासाठी सुप्रीम कोर्ट अशा पारंपारिक उपचाराचा वापर करण्यास सांगू शकत नसल्याचं’ म्हटलं आहे.

त्या लाल मुंग्यांच्या चटणीत नेमकं काय असतं?

Advertisement

नायधर पाढीयाल यांनी सांगितल्यानुसार, या लाल मुंग्यांच्या चटणीत कॅल्शियम, फॉर्मिक ॲसिड, प्रथिने, व्हिटॅमिन बी-12, झिंक व लोह यांचा समावेश असतो. ही मुलद्रव्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, असं त्यांचं म्हणणं आहे. ओडीसा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, नागालँड, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश, मणिपूर, आणि मेघालय या राज्यांमधील अनेक ठिकाणी लाल मुंग्यांचे सेवन केले जाते. तसेच त्याचा बर्‍याच रोगांवर उपचार म्हणून वापर केला जातो. आदिवासी भागात कोरोनाचा चा प्रादुर्भाव कमी असण्यामागे हे देखील एक कारण असू शकते, असे मत पाढीयाल यांनी व्यक्त केले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement