नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये 339 अप्रेंटिस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजे, त्यासाठीची पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण बातमी आहे. रेल्वेतील ही पदभरती कशी होणार आहे, त्यासाठी किती जागा आहेत, कोणत्या पदांसाठी भरती होतेय, त्यासाठी कधीपर्यंत मुदत आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
या पदांसाठी होणार भरती
वेल्डर
सुतार
फिटर
इलेक्ट्रीशियन
स्टेनो
वायरमन
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
मेकॅनिक डिझेल
पात्रता
वरील पदांसाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांकडे संबंधित ट्रेड / क्षेत्रातील आयटीआयचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांचे वय 24 वर्षांपर्यंत असावे.
निवडप्रक्रिया
निवडीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. 10 वी, तसेच आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 5 ऑक्टोबर 2021
अर्ज कसा करणार..?
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट apprenticeship.org वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.
४३२ अप्रेंटिस पदासाठीही भरती
दरम्यान, दक्षिण-पूर्व- मध्य रेल्वेतील (SECR) एकूण ४३२ अप्रेंटिस पदासाठीही अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून (ता. 11) सुरू होत आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 आहे. अधिक माहितीसाठी पात्र उमेदवारांनी secr.indianrailways.gov.in ला भेट द्यावी.