नणंद-भावजयीचं नातं थट्टामस्करीचं असतं.. दोघींचं वय साधारण सारखं असल्याने त्या एकमेकींची चेष्टामस्करी करीत असतात. मात्र, बऱ्याच घरांत नणंद-भावजयींमधून विस्तवही जात नसल्याचे दिसतं. त्यात आणखी एका घराची भर पडली आहे, हे घर आहे भारताचा अष्टपैलू सर रवींद्र जाडेजाचे..!
गुजरातच्या राजकारणातील हाय-प्रोफाईल नणंद-भावजयीची ही जोडी पुन्हा एकदा आमने-सामने आली आहे. जाडेजाच्या घरात त्याच्या दोन बहिणी व बायकोमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. त्यामुळे गुजरातसह भारतीय क्रिकेट चाहत्यांचेही या वादाकडे लक्ष लागले आहे.
जडेजाची बहीण नयबाना जडेजा आणि पत्नी रीवाबा जडेजा यांच्यात राजकीय वाॅर सुरु आहे. रवींद्र जडेजाची पत्नी रीवाबा ही भाजप नेता, तसेच सौराष्ट्रची करणी क्षत्रिय सेनेची अध्यक्षा आहे. तसेच ती समाजसेवेतही कायम अॅक्टिव्ह असते, तर दुसरीकडे जाडेजाची बहीण नयबाना ही काँग्रेस कार्यकर्ती आहे.
नणंद-भावजयीच्या या वादात रविंद्र जडेजाचा पाठिंबा पत्नी रीवाबाला आहे, तर नयबाना हिला तिची बहीण आणि वडिलांचा पाठिंबा आहे. त्यामुळे घरात कौंटुंबिक कलहापेक्षा राजकीय कलहच वाढल्याचे दिसत आहे.
कशामुळे पेटला वाद..?
जाडेजा घराण्यातील या नणंद-भावजयींमध्ये नुकतीच एका राजकीय कार्यक्रमावरून वादाची ठिणगी पडली. जाडेजाची बायको रिवाबा हिच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवाय स्वत: रियाबानेही व्यवस्थित मास्क घातलेला नव्हता.
जाडेजाची बहिण नयबाना हिने ही संधी साधत भावजयीवर निशाणा साधला. ‘गुजरातमध्ये कोरोनाची तिसरी लाट आणण्यासाठी या काम करीत आहेत..’ अशा शब्दांत टीका केली. त्यामुळे घरातील वातावरण तापले.
रिवाबा जडेजा मास्क न घालण्यावरून ऑगस्ट 2020 मध्येही वादात सापडली होती. कारमधून जाताना तिने मास्क न घातल्याने पोलिसांनी तिला रोखले होते. त्यावेळी तिने चूक मान्य करण्याऐवजी पोलिसांशी हुज्जत घातली होती. माध्यमांतून हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा रिवाबा नणंदेच्या टार्गेटवर आहे.