पुण्यासह (Pune) राज्यभर गणेशोत्सवाला (Ganesh utsav 2021) सुरुवात होत आहे. आज राज्यात व देशात सर्वत्र गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात होत आहे. आज शुक्रवारी (दि. 10) भाद्रपद शुद्ध चतुर्थीदिवशी श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी पहाटे 4 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 1 वाजून 48 मिनिटांपर्यंत घरगुती गणेश प्रतिष्ठापनासाठी मुहूर्त आहे.
मानाचे गणपती कोणते? ऑनलाईन दर्शन कसे घेणार?
1) मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती:
मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठा सकाळी 11 वाजून 38 मिनिटांनी होणार आहे. रोज सायंकाळी 8 वाजता श्रींच्या आरतीचा लाभ भाविकांना फेसबुक लाईव्हद्वारे घेता येणार आहे.
▪️ ऑनलाइन दर्शनासाठी https://m.facebook.com/ShriKasbaGanpati/ या लिंकचा वापर करावा असं सांगण्यात आले आहे.
2) मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी:
या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्तीची प्रतिष्ठापना सकाळी 11.30 वाजता सनई-चौघडेच्या सुरात होणार आहे. फेसबुक फेजवरून भक्तांना दर्शन घेता येणार आहे.
▪️https://youtube.com/c/ShreeTambadiJogeshwariGaneshotsavMandal या लिंकद्वारे सोहळ्यात सहभागी होता येईल.
3) मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम:
गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 1.00 वाजता केली जाणार आहे. मंडळाच्या फेसबुक पेजवर याचेही दर्शन होणार आहे.
▪️https://m.facebook.com/pages/category/Hindu-Temple/Guruji-Talim-Ganpati-Mandal-Pune-254009284620911/?locale2=hi_IN या ऑनलाईन लिंकद्वारे गणेश भक्तांना श्रीं चे दर्शन घेता येणार आहे.
4) *मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती:
तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना आज दुपारी 12.30 वाजता होणार आहे. मंडळाच्या फेसबुक पेजवर दर्शनाची सोय करण्यात आली आहे.
▪️https://youtube.com/channel/UCkp7fnImKGQxGMCB7LhTsDg या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा आनंद घेता येणार आहे.
5) मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती:
केसरीवाडा गणपती मंडळाच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना सकाळी 10 वाजता होणार आहे. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी होणार आहेत.
▪️ गणपतीच्या ऑनलाईन दर्शनाचा लाभ https://youtu.be/EiVjwaTbsb0 या लिंकद्वारे भाविकांना घेता येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. गीताली टिळक यांनी दिली आहे.
▪️ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 129 व्या वर्षानिमित्त 10 वाजून 23 मिनिटांच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त मंदिरावर आकर्षक आरास करण्यात येईल.
या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय: 👉 https://www.dagdushethganpati.com/live-darshan-01/ वर ऑनलाईन दर्शन घेता येईल.
▪️ लालबागचा राजा:
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे मुंबईतलं एक प्रसिद्ध जुनं गणेशमंडळ आहे. 1928 साली स्थापन झालेल्या या मंडळाचं यंदाचं 94 वं वर्ष आहे. या ठिकाणी आज शुक्रवारी (10 सप्टेंबर 2021) सकाळी 11 वाजल्यापासून ते रविवारी (19 सप्टेंबर 2021) सकाळी 7:00 वाजेपर्यंत ऑनलाईन दर्शनाची सुविधा 24 तास चालू राहणार आहे.
📌 ऑनलाईन दर्शनासाठी लालबागचा राजा च्या यूट्यूब चॅनलला भेट द्या: 👉 https://youtu.be/Yrfsd3NsGdQ
📌 अधिकृत वेबसाइटला भेट द्या: 👉 www.lalbaugcharaja.com
( नोंद घ्यावी: सदर लेखातील गणेश मंडळातील ऑनलाईन दर्शन हे बंद झाल्यास ते पुन्हा सुरू होण्यास वेळ लागेल किंवा ऑनलाईन दर्शनाची वेळ संपली असू शकते. अशा काही तांत्रिक अडचणी असू शकतात)