SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुराच्या पाण्यापासून कार वाचविण्यासाठी तरुणाने केला भलताच जुगाड; पाहा हा व्हायरल व्हिडीओ..

देशात पावसाने जोरदार कमबॅक करत खूप ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली आहे. तसेच काही भागात मोठ्या प्रमाणात नदी-नाले आणि ओढे तुडुंब भरले आहे. कुठे वाहने तर कुठे गाया-म्हशी वाहून गेल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण सध्या पाहत असतो.

असेच आता काल (दि.8) मंगळवारी तेलंगणाच्या काही भागात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी घुसले आणि रोजच्या कामांमध्ये हे पाणी अडथळा बनले आहे. याचाही व्हिडीओ भलताच पसरला आहे. काही राज्यांमध्ये दैनंदिन कामकाज ठप्प होत मुसळधार पावसाने रोजंदारी बुडत आहे. पाणी तुंबल्याने नुकसान होत आहे.

Advertisement

परंतु पाण्याच्या वेगापुढे आणि निसर्गापुढे आपण करणार काय म्हणून आपण फक्त आलेल्या परिस्थितीशी तोंड न देता फक्त वाट पाहतो ती फक्त काही काळ लोटल्यानंतर हे सगळं शांत होण्याची! आपल्याला बऱ्याचदा अशा परिस्थीतीत बघ्याची भूमिका पार पाडावी लागते. आता तुम्हाला सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे नक्कीच आश्चर्य वाटेल.

कारण या व्हिडीओत एका तरुणाने वेगळीच शक्कल लढवली आहे. ती म्हणजे त्याने आपली कार वाहून जाऊ नये म्हणून असा काही जुगाड लावला आहे कि, ज्यामुळे त्याची कार वाहून गेली नाही. हा जुगाड खरोखरच अशा परिस्थितीत फायद्याचा ठरला आहे. बहुतांश ठिकाणी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असं दिसतंय कि, एका तरुणाने मुसळधार पावसात आपली चार चाकी गाडी (Car) वाचवण्यासाठी एका दोरीच्या मदतीने तिला चारही बाजूने बांधून ठेवलं आहे. कार दोरीने बांधली आणि नंतर काही लोकांच्या मदतीने ती दोरी छतावरून ओढून धरली आणि घराच्या वरच्या काँक्रीटच्या खांबांना बांधले.

Advertisement

पुराच्या पाण्यापासून कार वाचविण्यासाठी ‘त्या’ तरुणाने काय केलं? पाहा व्हिडीओ..

Advertisement

 

आता असं केल्याने पावसाच्या पाण्यात कार अर्ध्यवट बुडाली खरी पण कार एका ठिकाणी नकीच स्थिर आहे आणि तिला पाण्याच्या प्रवाहाने काहीही फरक पडत नाही इतपत हा जुगाड केला आहे. असा हा अनोखा देसी जुगाड केल्याने या व्यक्तीचे दोन फायदे झाले, एकतर कार अर्धवट पाण्यात बुडाल्याने कारच्या जास्त आत पाणी गेलं नाही, ज्यामुळे कारचे काही पार्टस पाण्याने नंतर खराब होतात हे कारचं नुकसानं कमी झालं आणि महत्वाचं म्हणजे ही कार वाहून देखील गेली नाही. अहवालांनुसार हा व्हिडीओ तेलांगणातील आहे आणि पुरात अनेक वाहने वाहून गेल्याचे पाहून कार मालकाला ही कल्पना आली. हा देसी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार मालकाच्या युक्तीचे कौतुक देखील केलं आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement