SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

साताऱ्यात जोरदार राडा..! शिवेंद्रसिंहराजे व उदयनराजे समर्थक भिडले, मारामारीत सहा जण जखमी..!

साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. त्यातून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अधूनमधून चकमकी सुरु असतात. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये बुधवारी (ता. 8) सायंकाळी पहिल्यांदाच सशस्र हाणामारी झाल्याने खळबळ उडाली.

नेमकं काय झालं..?
उदयनराजे भोसले समर्थक असणारे सनी भोसले हे बुधवारी (ता. 8) संध्याकाळी मित्रांसमवेत सातारा शहरातील दुर्गा पेठेत गेले होते. याच ठिकाणी शिवेंद्रराजे यांचे समर्थक नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांचे ऑफिस आहे.

Advertisement

सनी भोसले यांनी त्यांची गाडी बाळासाहेब खंदारे यांच्या कार्यालयासमोरच लावली. त्यातून सुरवातीला खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. नंतर या बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. त्यात शस्रांचा वापर झाला. या धुमश्चक्रीमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली.

राड्यात सहा जण जखमी
साताऱ्यातील या राड्यात सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर साताऱ्यात तणावाचे वातावरण होते. रुग्णालय परिसरातही समर्थक कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने खासगी हॉस्पिटलबाहेर तणाव निर्माण झाला होता.

Advertisement

याबाबत सनी मुरलीधर भोसले (रा. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी नगरसेवक बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांविरुद्ध दरोडा, हाफ मर्डरसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

साताऱ्यात तणावपूर्ण शांतता
या मारामारीत संशयित आरोपींनी गुप्ती, रॉड, कोयत्याचा हल्ल्यासाठी वापर केला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखविल्याचे सनी भाेसले यांनी तक्रारीत म्हटले आहे. राजपथावरील पोलिस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समजते. साताऱ्यात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement