SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषकासाठी ‘हे’ दिग्गज खेळाडू संघात, धोनीवर मोठी जबाबदारी!

बीसीसीआयने (BCCI) टी 20 वर्ल्ड कपसाठी (ICC Mens T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने अंतिम 15 जणांचा संघ जाहीर केला असल्याची ट्विट करून माहिती दिली आहे. युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबुधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अकॅडमी मैदान येथे खेळवले जाणार आहेत.

क्रिकेट फॅन्सला (Cricket Fans) माहीतच आहे की, भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 साली पहिल्यांदाच झालेला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता, पण यानंतर मात्र टीमला पुन्हा याची पुनरावृत्ती करता आलेली नव्हती. आता विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीत असेल.

Advertisement

टी-20 वर्ल्ड कप पुढील महिन्यात 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून भारताचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबरला होणार आहे तर या स्पर्धेची फायनल 14 नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज आर. अश्विनचं (R Ashwin) 4 वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झालं आहे.

T-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ..

Advertisement

अंतिम 15 खेळाडू: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

Advertisement

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर

धोनीवर टीम इंडियाची जबाबदारी..

Advertisement

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्या नेतृत्वात आयसीसीच्या तिन्ही प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. दरम्यान या टी 20 वर्ल्ड कपसाठी धोनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. धोनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून असणार आहे, याबाबतची माहिती जय शाह यांनी दिली आहे. अशी माहीती आहे की, विश्वचषकासाठी 15 जणांची टीम निवडण्यातही धोनीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

टीम इंडियाचं वेळापत्रक:

Advertisement

▪️ 24 ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान
▪️ 31 ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूझीलंड
▪️ 3 नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
▪️ 5 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-बी क्वालिफायर टॉप टीम
▪️ 8 नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप-ए क्वालिफायर दुसरी टीम
▪️ 10 नोव्हेंबर- पहिली सेमी फायनल
▪️ 11 नोव्हेंबर- दुसरी सेमी फायनल
▪️ 14 नोव्हेंबर- फायनल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement