कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक अशा जवळजवळ 48 हजार कलावंतांना महिन्याला 5 हजार रुपये मानधन देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी दिली आहे.
कोरोना काळात राज्यभरातील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे महाराज मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे. वारकरी संप्रदायाची दुरावस्था झाल्याचे विठ्ठल पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि राज्यातील कलावंतांमध्ये वारकरी संप्रदायाचा समावेश करण्याची मागणी केली.
दरम्यान त्यांनी यासह इतर प्रमुख मागण्या केल्या होत्या. यामुळे लवकरच आता राज्यातील महाराज मंडळींना दिलासा मिळणार असल्याचे विठ्ठल पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. यासंदर्भात काल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील व इतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली.
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये अनेक कुटुंब उध्वस्त झाली. कित्येक जणांचे प्राण गेले. सरकारने कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लसी देण्याचाही कार्यक्रम सुरू केला. सर्व ठिकाणी अटकाव घालण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. मात्र लोकांनीही शासनाने घालून दिलेले निर्बंध पाळणे आवश्यक बनले आहेत. अशात काहींना कोरोना संकटाने घेरल्याने आयुष्य अंधारात गेले आहेत.
आता श्रावण महिना संपला आहे आणि सणासुदीचे दिवस सुरु झाले आहे. गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, दसरा, ख्रिसमस सण काही दिवसांवर आले आहेत. अशा वेळेस गर्दी होण्याची दाट शक्यता असते. पण अशी गर्दी होऊ नये म्हणून शासन आता जमावबंदीसारखे निर्बंध घालण्याच्या तयारीत आहे. तसंच राज्यभरातील मंदिरे, देवस्थाने देखील पुढचे अनेक दिवस बंदच राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देत आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews