SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धोनीच्या निवडीबाबत बीसीसीआयकडे तक्रार, टीम इंडियातील निवडीवरुन वाद सुरु, कशामुळे होतोय विरोध..?

आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी कालच (बुधवारी) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघाचा मेंटॉर, अर्थात मार्गदर्शक म्हणून निवडण्यात आले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) या निर्णयाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मोठ्या स्पर्धेतील धोनीच्या अनुभवाचा संघाला फायदा व्हावा, यासाठी दोन वेळा विश्वचषक जिंकलेल्या धोनीला निवडल्याचे सांगण्यात येते. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाला तो मार्गदर्शन करणार आहे. मात्र, धोनीच्या या निवडीवर आक्षेप घेण्यात आलाय.

Advertisement

तक्रारीत म्हटलेय…
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी सदस्य संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीला लेखी पत्र पाठवून धोनी विरुद्ध तक्रार केली आहे. हितसंबंधांचा संघर्ष, म्हणजेच ‘कॉनफ्लिक्ट ऑफ इन्ट्रेस्ट’ नियमाअंतर्गत ही तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे धोनीची नियुक्ती नियमांत अडकण्याची शक्यता आहे.

लोढा समितीच्या शिफारशींनुसार, एक व्यक्ती एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. महेंद्रसिंग धोनी सध्या ‘आयपीएल’मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे. त्याच वेळी त्याला टीम इंडियाचा मेंटॉर नेमणे, ही बाब लोढा समितीच्या शिफारशींनुसार योग्य नसल्याचे गुप्ता यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Advertisement

तक्रारीत तर्क नाही : बीसीसीआय
दरम्यान, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी या तक्रारीत काहीच तर्क नसल्याचे म्हटलंय. संघाची निवड झाली असून, धोनी केवळ मार्गदर्शक आहे. तसेच, आयपीएलनंतर टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. धोनी आयपीएलचा पुढील सिझन खेळेल की नाही, हे स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले.

विश्वचषक स्पर्धा आयपीएलनंतर होणार आहे. आयपीएलनंतर प्रत्येक खेळाडू हा करारमुक्त असेल. पुढील पर्वाआधी लिलाव होईल, त्यानंतरच संघात नवीन लोकांचा समावेश केला जाणार आहे. पुढील पर्वात धोनी ‘सीएसके’च्या संघात असेल की नाही, हेही आता सांगता येत नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

धोनीचा आभारी आहे : गांगुली
टी-२० विश्वचषकासाठी संघासोबत मार्गदर्शक म्हणून जाण्याची तयारी दर्शविल्याबद्दल धोनीचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने आभार मानले. तो म्हणाला, की “धोनीच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल. बीसीसीआयची ऑफर स्वीकारल्याबद्दल मी धोनीचा आभारी आहे..!”

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement