SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार, राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर..!

गणेशोत्सवाला येत्या 10 तारखेपासून सुरवात होत आहे. सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले असले, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. यंदाही साध्या पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

लाडक्या बाप्पाला वाजत-गाजत आणण्यासाठी गणेशभक्त उत्सुक आहेत. मात्र, दुसरीकडे कोरोनाचा धोका कायम असल्याने, राज्य सरकारने सार्वजनिक गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाविकांना त्याचे पालन करावे लागणार आहे.

Advertisement

नव्या नियमानुसार राज्यात सार्वजनिक गणपतीचे फक्त ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. भाविकांना प्रत्यक्ष मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर प्रतिबंध लावले आहेत. भाविकांना मुखदर्शनही घेता येणार नाही. यासह राज्य सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली जाणून घेऊ या..

गणेशोत्सवासाठी नवी नियमावली

Advertisement

– सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिका वा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
– मर्यादित स्वरुपात मंडप उभारण्यात यावेत. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असून, घरगुती आणि सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

– श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट, तर घरगुती गणपतीकरिता २ फुटांची मर्यादा आहे.
– शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर मूर्तीचे पूजन करावे, शाडूची पर्यावरणपूरक मुर्ती असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास, नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी करावे.

Advertisement

– उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे. आरोग्यविषयक, सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिराती प्रदर्शित कराव्यात.

– सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम / रक्तदानासारखी शिबिरे घ्यावीत. कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय, तसेच जनजागृती करावी.

Advertisement

– वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमांचे पालन करावे, पूर्वीचे निर्बंध कायम राहतील. त्यात कुठलीही शिथिलता देता येणार नाही.

– आरती, भजन, कीर्तन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. ध्वनीप्रदुषणांसंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Advertisement

– श्रींचे आगमन व विसर्जन मिरवणूका काढू नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करावी. विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

– लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील सर्व घरगुती गणेशमुर्तीच्या विसर्जन मिरवणूक एकत्रित काढू नयेत.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement