SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीला सुरवात..! खरेदी प्रक्रिया, लोन, सबसिडीबाबत माहितीसाठी वाचा..!

ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीला आजपासून सुरुवात झाली. ओलाने 15 ऑगस्टलाच ही स्कूटर लाॅंच केली होती. त्या आधीपासून या स्कूटरसाठी बुकिंग सुरु होते. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 1 लाखांचा टप्पा पार केल्याने ही स्कूटर भारतात धुमाकूळ घालणार असल्याचे म्हणणे जाणकारांनी व्यक्त केलंय.

ओलाने आजपासून (ता. 8) ‘ओला-S1’ आणि ‘ओला-S1 Pro’ विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. त्याची किंमत 99,999 हजारांपासून सुरु होते. दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये आहे.

Advertisement

महाराष्ट्रासह काही राज्यांनी सबसिडी जाहीर केलीय. काही राज्यांनी सबसिडी जाहीर केलेली नसल्याने फक्त केंद्र सरकारच्याच सबसिडीवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे या स्कूटरला कसा प्रतिसाद मिळतोय, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

इंधन दरवाढीमुळे तुम्हीही वैतागला असाल, तसेच ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बूक केलेली असेल, तर ही स्कूटर कशी खरेदी करायची, त्यासाठी लोन मिळेल का, सबसिडी कशी मिळेल, याबाबत समजून घेऊ या..

Advertisement

ओला स्कूटर कशी खरेदी करणार..?
ओला कंपनीने कोणतीही डिलरशीप दिलेली नसल्याने ओला इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाईनच खरेदी करावी लागणार आहे. ओलाने स्कूटरसाठी बुकिंग केलेल्या ग्राहकांना मेसेज पाठविले आहेत. त्यात एक लिंक दिली असून, त्यात स्कूटरची खरेदी? कर्ज कसे मिळवायचे? कधी डिलिव्हर होईल, याची माहिती दिलीय.

ओला S1 खरेदीसाठी ‘विंडो स्टॉक’ संपेपर्यंत उपलब्ध असेल. तसेच ‘ओला S1 Pro’ देखील उपलब्ध असून, हे दोन्ही व्हेरिअंट 10 रंग आणि दोन फिनिशेसमधून निवडता येणार आहेत.

Advertisement

कर्जावर ओला स्कूटर घेणाऱ्यांसाठी ‘ओला फायनान्स सर्व्हिस’ (OFS)) सुरु केलीय. ‘ओला S1’ खरेदीसाठी अॅडव्हान्सही देऊ शकता. कर्जासाठी कंपनीने ‘आयडीएफसी फर्स्ट बॅंक’, ‘एचडीएफसी’, ‘टाटा कॅपीटल’सोबत हातमिळवणी केली आहे.

ओला-S1 साठी ईएमआय 2999 पासून, तर ओला S1 Pro साठी 3199 रुपयांचा ईएमआय ठेवला आहे. एचडीएफसी बॅंक काही मिनिटांत प्री- अॅप्रूव्हड लोन देतेय. त्यासाठी ओला आणि ओला ईलेक्ट्रीक अॅप वापरावे लागेल. टाटा कॅपीटल नि आयडीएफसी फर्स्ट बॅंक डिजिटल केवायसी प्रक्रियेतून लोन देणार आहेत.

Advertisement

कर्जाची गरज नसल्यास तुम्ही 20,000 रुपये अॅडव्हान्स भरून ‘Ola S1’ आणि 25000 रुपये भरून Ola S1 Pro बुक करू शकता. उरलेली रक्कम स्कूटर डिलिव्हर करताना द्यावी लागेल. डाऊन पेमेंट, अॅडव्हान्स हे रिफंडेबल असतील. स्कूटर शिप होईपर्यंत बुकिंग रद्द करता येणार आहे.

ऑक्टोबरपासून घरपोच डिलिव्हरी
ओला- S1 ची डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरु होईल. थेट घरी तुम्हाला स्कूटर मिळेल. मात्र, पैसे देण्यास विलंब केल्यास, तुम्हाला मिळणारी स्कूटर दुसऱ्या ग्राहकाला दिली जाईल. नंतर उशिराने दुसरी स्कूटर तुम्हाला मिळेल.

Advertisement

ओला स्कूटरला कंपनीने तीन वर्षांची वॉरंटी दिली आहे. बॅटरीला तीन वर्षे अनलिमिटेड किलोमीटरची वॉरंटी आहे. तसेच स्कूटरच्या पार्टवर तीन वर्षे किंवा 40000 किलोमीटर, जे पहिले असेल ते. सर्व्हिसिंग तीन ते सहा महिन्यांनी असेल. त्यासाठीची माहिती ओला अॅपवर माहिती मिळेल.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement