महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न वाढत चालला आहे. परंतू आता महिलाही खूप सक्षम झाल्याच्या पाहायला दिसतात. कोणत्याही महिलेची छेड काढणं, चिडवणं किंवा बघणंही असो काही जणांच्या चांगलंच महागात पडतं. असाच एक प्रकार घडला आहे. एकाने महिलेचा मोबाईल नंबर मागितला आणि मग जे झालं ते लोकही पाहतच राहिले.
चप्पल गर्लचा व्हिडीओ व्हायरल
आता अलीकडेच एका”चप्पल गर्ल”चा व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. एका धाडसी तरुणीने रोडरोमिओला भर रस्त्यात चांगलंच धुतलं आहे. त्याला कधी न घडलेली अद्दल घडवली आहे. तरुणाला तिने भररस्त्यात चपलेने धुतला आहे.
आता तुम्ही म्हणाल की, नेमकं असं काय झालं की, या महिलेने त्या व्यक्तीला मारलं. त्या महिलेला मोबाईल नंबर मागणाऱ्या तरुणाची पायातील चप्पल काढून धुलाई केली आहे. तरुणीने हा व्यक्ती आपली छेड काढत असल्याचा आरोप करत त्याला काही शब्द मोठ्या आवाजात ऐकवले, तर त्या व्यक्तीने आपण काहीच केलं नसून यात आपण निर्दोष असल्याची वारंवार विनंती करत आहे.
डलमऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोह गावात राहणारी तरुणी आपल्या काही कामासाठी बाहेर आली होती. काम झाल्यानंतर ती घरी परतत होती. त्यावेळी रस्त्यात एक तरुण तिचा पाठलाग करत असल्याचं तिच्या लक्षात आलं.
त्यानंतर त्याने तिच्यासोबत गैरवर्तन केलं, तिची छेड काढण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याने तरुणीकडे तिचा मोबाईल नंबर मागण्यास सुरुवात केली. तिचा पाठलाग करत तो घुरवारा चौकीपर्यंत पोहोचला.
थोडी शाब्दिक चकमक होऊन ती मुलगी थेट आपल्या पायातील चप्पल हातात घेते आणि त्या मुलाला मारायला सुरूवात करते. तो मुलगाही काही न म्हणता आपली चूक असल्यामुळे निमूटपणे मार खाऊन घेत असल्याचं दिसून येतं आहे.
या चप्पल गर्लचा व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 👉 https://www.instagram.com/p/CTjb8nZifbl/?utm_medium=copy_link
तरुणीला असं तरुणाला मारताना पाहून रस्त्यात लोक मोठ्या संख्येने जमा झाले. तिथे आले. त्यांनी त्या दोघांनाही समजावलं. त्यावेळी तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका युट्यूब यूजरने शेअर केला आहे. यामध्ये तरुणीने चप्पलेने मारताना दिसत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews