SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दहशतवाद्यांकडून सरकार स्थापन; तालिबानच्या मंत्रिमंडळात कोणाला कोणती पदे, वाचा..

अमेरिकन सैन्यांनी माघार घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. आता तालिबानच्या संस्थापकांपैकी एक मुल्ला उमर यांचे निकटवर्तीय मुल्ला हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान असतील. तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरदार यांची उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत देशात अंतरिम सरकार स्थापनेची घोषणा केली. तालिबानला सहकार्य करणाऱ्या अनेक गटांच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर अखुंदच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तालिबानकडून घेण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण निर्णयांबद्दल अंतिम जबाबदारी असणाऱ्या रहाबारी शूरा या नेत्यांच्या परिषदेचे प्रमुख आहेत. तालिबान जे निर्णय घेतं त्यामागे असणाऱ्या परिषदेला रहबारी शूरा असं म्हटलं जातं.

Advertisement

तालिबानचं नवं मंत्रिमंडळ:

▪️ पंतप्रधान – मुल्ला मोहम्मद हसन अखूंद
▪️ उपपंतप्रधान 1 – मुल्ला बरादर
▪️ उपपंतप्रधान 2 – अब्दुल सलाम हनाफी
▪️ गृहमंत्री – सिराजुद्दीन हक्कानी
▪️ संरक्षण मंत्री – मोहम्मद याकोब मुजाहिद
▪️ अर्थमंत्री – मुल्ला हिदायतुल्ला बदरी
▪️ परराष्ट्र मंत्री – मौलवी अमीर खान मुतक्की
▪️ शिक्षण मंत्री – शेख मौलवी नूरुल्ला मुनीर
▪️ न्याय मंत्री – मौलवी अब्दुल हकीम शरिया
▪️ उच्च शिक्षण मंत्री – अब्दुल बाकी हक्कानी
▪️ ग्रामविकास मंत्री – युनूस अखुंदजादा
▪️ शरणार्थी व्यवहार मंत्री – खलीलुर रहमान हक्कानी
▪️ लोक कल्याण मंत्री – मुल्ला अब्दुल मनन ओमारी
▪️ दळणवळण मंत्री – नजीबुल्लाह हक्कानी
▪️ खाण आणि पेट्रोलियम मंत्री – मुल्ला मोहम्मद आसा अखुंद
▪️ मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी – मुल्ला अब्दुल लतीफ मंसौर
▪️ हवाई वाहतूक मंत्री – हमीदुल्ला अखुंदजादा
▪️ माहिती आणि संस्कृती मंत्री – मुल्ला खैरुल्ला खैरखवाह
▪️अर्थमंत्री – कारी दिन मोहम्मद हनीफ
▪️ हज आणि औकाफ मंत्री – मौलवी नूर मोहम्मद साकीब
▪️सीमा आणि आदिवासी व्यवहार मंत्री – नूरुल्ला नूरी
▪️ उपपरराष्ट्र मंत्री – शेर मोहम्मद स्टेनकझाई
▪️ उपअर्थमंत्री – मुल्ला मोहम्मद फाजील अखुंद
▪️ संस्कृती मंत्रालयाचे उपमंत्री – जबीउल्लाह मुजाहिद
▪️ संरक्षण मंत्रालयातील लष्करप्रमुख – कारी फसिहुद्दीन
▪️लष्करप्रमुख – मुल्ला फजल अखुंद
▪️ गुप्तचर महासंचालक – अब्दुल हक वासिक
▪️ गुप्तचर विभागाचे उपप्रमुख – मुल्ला ताज मीर जवाद
▪️राष्ट्रीय सुरक्षा संचालनालय (एनडीएस) प्रमुख – मुल्ला अब्दुल हक वासिक
▪️ अफगाणिस्तान बँकेचे प्रमुख – हाजी मोहम्मद एड्रिस
▪️ कारभाराचे प्रशासन – मौलवी अहमद जान अहमदी
▪️ चीफ ऑफ स्टाफ – फसिहुद्दीन

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement