SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुःखद बातमी: अक्षय कुमारच्या आईचं निधन; उद्या होता अक्षयचा वाढदिवस?

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची आई अरुणा भाटिया यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अक्षय कुमारने स्वत: एक ट्वीट करत ही दुःखद बातमी दिली आहे. वृद्धापकाळातील समस्यांमुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने अरुणा भाटिया यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटलं की…

Advertisement

“ती माझा गाभा होती आणि आज मला तिच्या जाण्याने अंतःकरणात असह्य वेदना होत आहेत. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया यांनी आज शांततेत जगाचा निरोप घेतला आहे आणि ती दुसऱ्या जगात माझ्या वडिलांकडे गेली आहे. या अवघड परिस्थितीत माझ्या कुटुंबासाठी तुम्ही केलेल्या प्रार्थनांना आदर करतो. ओम शांती”, असं ट्वीट अक्षयने केलं आहे.

अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar) आपल्या आईसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन याआधी चाहत्यांना केलं होतं, तेव्हा त्यासाठी त्याने एक ट्वीट केलं होतं. त्यात अक्षय म्हणाला होता की, “माझी आईच्या आरोग्यासाठी तुम्ही नेहमीच चिंता आणि प्रार्थना करतात, हे पाहून मी खूप भारावून गेलो आहे. मी व माझ्या कुटुंबियांसाठी या कठिण वेळेत तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे खूप मदत होईल.”

Advertisement

अरुणा भाटीया (Aruna Bhatiya Death) यांना मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी अरुणा यांची प्रकृती गंभीर होती. अक्षय कुमार त्यावेळी आपला आगामी चित्रपट ‘सिंड्रेला’च्या शूटिंगसाठी लंडनमध्ये होता. अक्षयला आईच्या आजारपणाबाबत माहिती मिळाली, तो तात्काळ लंडनहून मुंबईत लगेच आला आहे. आता अरूणा भाटिया यांच्या अंत्यदर्शनाला (Aruna Bhatiya Death Funeral) रमेश तौरानी, साजिद खान, रोहित शेट्टी (Ramesh Taurani, Sajid Khan, Rohit Shetty) आणि इतर अनेक मंडळी दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांनी अभिनेत्याला ट्वीट द्वारा त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं आहे.

Advertisement

9 सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस..?

उद्या म्हणजेच 9 सप्टेंबरला अक्षयचा वाढदिवस आहे आणि आज त्याच्या आईचं निधन झालं आहे. वडिलांचं निधन याआधीच झाले होते, आता आईही दुसऱ्या जगात गेल्याचं त्याला दुःख झालं आहे. अक्षयला त्याचे काम मध्येच सोडणे कधीच आवडत नाही. तो अर्थातच भारतात परतला आहे, पण त्याने प्रोड्युसरला शूटिंग तसेच चालू ठेवण्यास सांगितले आहे आणि जिथे दृश्यांमध्ये त्याची गरज नाही, ती शूट करायला सांगितलं आहे. वैयक्तिक त्रास कितीही झाला, तरी त्याचा परिणाम कामावर होऊ देत नाही व कमिटमेंटची काळजी तो नेहमीच घेतो.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement