SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲप बंद होणार? ‘या’ यादीत तुमचा स्मार्टफोन आहे का, लगेच तपासा..

व्हॉट्सअप म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग बनला आहे. तुमच्या फोनवरील व्हॉट्सअपची सेवा कधीही बंद होऊ शकते. व्हॉट्सअपने सुरक्षितता बाळगण्यासाठी जुन्या स्मार्टफोन्सना सपोर्ट न देण्याचं ठरवलं आहे.

तुमचा स्मार्टफोन जुना आहे का?

Advertisement

1 नोव्हेंबरपासून, फेसबुकच्या मालकीचे प्लॅटफॉर्म अँड्रॉइड ओएस 4.1, ॲपलच्या आयओएस 10 आणि काईओएस 2.5.1. पेक्षा जुन्या सिस्टीमवर चालणाऱ्या फोनवर काम करणे बंद करेल. या सर्व फोनला व्हॉट्सॲपकडून सपोर्ट मिळणार नाही अर्थातच अशा स्मार्टफोन्सवर व्हॉट्सॲप चालणं बंद होणार असल्याची माहीती आहे. जर यात तुमचा मोबाईलचा समावेश होत असेल, तर तुम्हाला मोबाईल अपग्रेड करावा लागणार आहे.

▪️ सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाइट, गॅलेक्सी ट्रेंड II, गॅलेक्सी एस-2, गॅलेक्सी एस-3 मिनी, गॅलेक्सी एक्सकव्हर-2, गॅलेक्सी कोर आणि गॅलेक्सी एस-2 (Samsung Galaxy Trend Lite, Galaxy Trend II, Galaxy SII, Galaxy S3 mini, Galaxy Xcover 2, Galaxy Core, and Galaxy Ace 2)

Advertisement

▪️ एलजी ल्युसिड 2, ऑप्टिमस एफ 7, ऑप्टिमस एफ 5, ऑप्टिमस एल 3 II ड्युअल, ऑप्टिमस एफ 5, ऑप्टिमस एल 5, ऑप्टिमस एल 5 II, ऑप्टिमस एल 5 ड्युअल, ऑप्टिमस एल 3 II, ऑप्टिमस एल 7, ऑप्टिमस एल 7 II ड्युअल, ऑप्टिमस एल 7 II, ऑप्टिमस एफ 6 , Enact, ऑप्टिमस एल 4 II Dual, ऑप्टिमस एफ 3, ऑप्टिमस एल 4 II, ऑप्टिमस एल 2 II, ऑप्टिमस नायट्रो एचडी आणि 4X एचडी, आणि ऑप्टिमस F3Q (LGs Lucid 2, LG Optimus F7, LG Optimus F5, Optimus L3 II Dual, Optimus F5, Optimus L5, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L5 II, Optimus L5 Dual, Optimus L3 II, Optimus L7, Optimus L7 II Dual, Optimus L7 II, Optimus F6, Enact , Optimus L4 II Dual, Optimus F3, Optimus L4 II, Optimus L2 II, Optimus Nitro HD and 4X HD, and Optimus F3Q)

▪️ Apple – first generation iPhone SE, 6s आणि 6s Plus

Advertisement

▪️ ZTE – The ZTE Grand S Flex, ZTE V956, Grand X Quad V987 आणि Grand Memo

▪️ Huawei -The Huawei Ascend G740, Ascend Mate, Ascend D Quad XL, Ascend D1 Quad XL, Ascend P1 S आणि Ascend D2.

Advertisement

▪️ सोनी एक्सपीरिया मिरो, सोनी एक्सपीरिया नियो एल आणि एक्सपीरिया आर्क एस (Sony’s Xperia Miro, Sony Xperia Neo L, and Xperia Arc S)

▪️ अल्काटेल वन टच इव्हो 7, आर्कोस 53 प्लॅटिनम, एचटीसी डिझायर 500, लेनोवो ए 820 (Alcatel, HTC, Lenovo)

Advertisement

तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला त्या फोनवर व्हॉट्सऍप वापरता येणार नाही. एकदा का व्हॉट्सऍपने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे आजच आपला फोन तपासून घ्या. तुमचा फोन आऊटडेटेड सिस्टमवर काम करत असेल तर नवीन स्मार्टफोन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच कंपनीने Whatsapp युझर्सना iOS वरून अँड्रॉइड डिव्हाईसवर स्विच करता येणार आहे. त्यांचे चॅट स्थलांतरित करण्याची परवानगी दिली आहे. “हे फिचर अँड्रॉइड 10 किंवा त्यापेक्षा जास्त चालणाऱ्या कोणत्याही सॅमसंग डिव्हाइसवर उपलब्ध आहे आणि लवकरच ते इतर Android डिव्हाइसवर उपलब्ध होईल,” असं WhatsApp ने सांगितले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement