SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत ‘धो-धो’ पाऊस बरसणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज..

महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमूसळधार पावसाची शक्यता वाढली आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने याबाबत अंदाज वर्तवला आहे. बंगाल सागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर टप्प्या टप्प्याने याचा प्रभाव असणार आहे.

दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार व अतिमूसळधार (Heavy rains in Maharashtra in next 2 to 3 days) पाऊस असेल. तसेच काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचा सर्वात जास्त प्रभाव उत्तर कोकणात असेल.

Advertisement

पावसाचा जोर कुठे राहणार?

ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार आणि अतिमूसळधार पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Advertisement

कोकणात काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. त्यात पावसाचा मुक्काम असल्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनावर परिणाम होत आहे. मुंबई, सातारा तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिसरात पाऊस जास्त वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे.

चिपळूणमध्ये पुन्हा सतर्क राहण्याच्या सूचना : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. वाशिष्ठी नदी पात्राची पातळी सध्या धोक्याची नाही. पुन्हा पाणी भरण्याची भीती व्यक्त होत आहे. नगरपालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दापोलीलाही पावसानं झोडपले आहे

Advertisement

‘या’ ठिकाणी गारपीटही झाली..

यवतमाळसह नेर तालुक्यातील गावांत गारपीट झाली. वाई हातोला, आनंद नगर, टाकळी सलामी, पिंपरी कलगा, माणिकवाडा गावांना गारांचा तडाखा बसला. यासोबत आर्णी, पुसद, उमरखेडमध्येही जोरदार पाऊस बरसला. सोसाट्याच्या वारा व विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. वीजपुरवठा खंडित झाला आणि या अचानक आलेल्या पावसामुळे बैल पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची धावपळ उडाली.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement