SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सलमान खान, अक्षय कुमारसह 38 सेलिब्रिटींविरुद्ध तक्रार, अत्याचार पीडितेची ओळख सार्वजनिक केली, नेमकं प्रकरण काय, वाचा..!

अत्याचार पीडितेचे नाव, फोटो प्रसिद्ध करुन तिची ओळख सार्वजनिक करणे, हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मात्र, अनेकांकडून भावनेच्या भरात वा नजरचूकीने अशी चूक होते. त्यातून पीडित महिलेसह तिच्या कुटुंबीयांना समाजात वावरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

अशीच एक चूक बाॅलिवुडमधील प्रसिद्ध कलाकारांकडून घडली. एका अत्याचार पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी बॉलिवूडच्या 38 सेलिब्रिटींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यात सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण या सेलिब्रिटींचाही समावेश आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय..?
2019 मध्ये हैदराबाद येथे एक माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला होता. पशूवैद्यक असणाऱ्या तरुणीवर काही जणांनी सामूहिक अत्याचार करुन तिला जिवंत जाळलं होतं. या घटनेचे त्यावेळी तिव्र पडसाद उमटले. देशभरात संतापाची लाट उसळली होती.

दरम्यान, अनेकांनी या तरुणीला श्रद्धांजली वाहताना गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्याची मागणी केली होती. त्यावेळी बाॅलिवुडसह काही दाक्षिणात्य सेलिब्रिटींनीही पीडित तरुणीला सोशल मीडियातून श्रद्धांजली वाहिली होती. या घटनेबाबत संताप व्यक्त केला हाेता.

Advertisement

मात्र, तरुणीला श्रद्धांजली वाहताना, या कलाकारांनी पीडितेचा फोटाे व नाव आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन उघड केले होते. त्यातून तिची व तिच्या कुटुंबाची ओळख सार्वजनिक करण्यात आली.

बाॅलिवुड सेलिब्रिटींविरुद्ध तक्रार
दरम्यान, हैदराबाद येथील या पीडित तरुणीची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बाॅलिवुड सेलिब्रिटींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भारतीय दंड विधान कलम 228 (अ) अन्वये तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Advertisement

अशा प्रकरणात सेलिब्रिटींनी संवेदनशीलता राखणे गरजेचे आहे. अतिशय बेजबाबदारपणे अत्याचार पीडितेची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी गुलाटी यांनी याचिकेतून केली आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement