SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आईच्या प्रियकराकडून मुलीने उकळली लाखाेंची खंडणी..! धडा शिकवायला गेली, जाळ्यात अडकली..!

आईच्या प्रियकराला धडा शिकविण्यासाठी मुलीने तिच्या मित्राच्या मदतीने लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला. मात्र, मुलीचा हा बनाव अखेर समोर आला. पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य सुत्रधार मुलीसह तिच्या मित्राला बेड्या ठोकल्या.

मिथून मोहन गायकवाड (वय 29, रा. कुरबावी, ता. माळशिरस) व कर्वेनगर परिसरातील 21 वर्षीय तरूणीला पोलिसांनी अटक केलीय, तर त्यांचा आणखी एका साथीदार फरार झाला आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

Advertisement

याबाबत 42 वर्षीय पीडित व्यक्तीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा बिल्डींग साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरातील एका महिलेसोबत फिर्यादीचे प्रेमसंबध होते. मात्र, महिलेच्या मुलीचा त्यास विरोध होता. आईच्या प्रियकराला धडा शिकविण्याचा चंग तिने बांधला होता. त्यासाठी तिला मित्राने मदत केली.

Advertisement

मे 2021 मध्ये फिर्यादीला फोन करुन दोघांनी बिल्डींग बांधकाम साहित्याबाबत विचारणा केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दोघे दुकानात आले. साहित्याची चौकशी करीत असतानाच, एकाने अचानक फिर्यादीला शिवीगाळ सुरु केली.

‘तुझे एका महिलेसोबत प्रेमसंबंध असून, त्याचे फोटो आमच्याकडे आहेत, असे सांगून फिर्यादीला मोटारीतून पुण्यातील अलंकार पोलिस चौकीजवळ नेले. कारमध्ये त्यास मारहाण करीत फिर्यादीचा मोबाईल हिसकावून घेत त्यातील फोटो व व्हिडीओ घेतले.

Advertisement

ते व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे 15 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. या महिन्यात एक लाख व आठ महिन्यानंतर सर्व पैसे द्यायचे, असे धमकाविले.

या घटनेबाबत फिर्यादीने सगळी माहिती महिलेला सांगितली. महिलेने हा प्रकार तिच्या मुलीला सांगितला. त्यानंतर संशयीत आरोपींनी या मुलीलाच फोन करून फिर्यादीकडून एक लाख रूपये घेऊन कात्रज परिसरात येण्यास सांगितले. असे दोन वेळा संशयीत आरोपींनी दोन लाख रूपये घेतले.

Advertisement

आरोपींना पैसे देण्यासाठी फिर्यादीला त्याची गाडी विकावी लागली. मात्र, त्यानंतरही आरोपींचा पैशासाठी तगादा सुरुच होता. अखेर त्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी खंडणीविरोधी पथकाला या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले.

फिर्यादीच्या सांगण्यानुसार पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असता, सुरूवातीलाच त्यांना मुलीवर संशय आला. तांत्रिक विश्लेषनाद्वारे पोलिसांनी तिची गोपनीय माहिती काढली असता, सुरुवातीपासूनच ती संशयीत आरोपीच्या संपर्कात असल्याचे समोर आले.

Advertisement

पोलिसांनी सावधपणे तपास करताना, मुलीला पत्ता लागू दिला नाही. संशयीत आरोपींचा राहिलेले पैसे मागण्यासाठी फोन आल्यानंतर पोलिसांनी पहिल्यांदा डेक्कन परिसरात सापळा रचला. पण, संशयीत आरोपींनी त्या ठिकाणी पैसे न घेता, दगडूशेठ गणपती मंदिराजवळ पैसे घेतले.

पोलिसांनी तेथे सापळा रचून संशयीत आरोपी गायकवाड याला अटक केली. चौकशीत या मुलीच्या सांगण्यावरून हा सर्व कट रचल्याचे समोर आले.

Advertisement

आईच्या प्रियकराला धडा शिकविण्यासाठी मुलीने आईचे व्हॉटस्अ‍ॅप हॅक करून सर्व फोटो काढून ते मित्र गायकवाडला पाठविले होते. सुरुवातीला फिर्यादीला धडा शिकवायचा, असे ठरले होते. मात्र, नंतर त्यांनी फिर्यादीकडून 15 लाखांच्या खंडणीची मागणी केली.

खंडणीच्या पैशांचे काय केले..?
फिर्यादीकडून आरोपींनी 2 लाख 60 हजार रुपये उकळले होते. आरोपी गायकवाडने या पैशातून कर्ज फेडले, तर तरुणीने शॉपींग केली. तरुणीचेही विवाहित मित्र गायकवाड याच्यासोबत पाच-सहा वर्षांपासून प्रेमसंबध असल्याचे समोर आले आहे.

Advertisement