जर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवले असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) एफडीच्या नियमांमध्ये बदल केलेत. त्यानुसार आता तुम्हाला FD करण्यापूर्वी जास्त विचार करावा लागेल.
RBI ने फिक्स्ड डिपॉजिटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. म्हणून आता तुमच्या एफडीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाला असेल आणि तुम्ही परताव्याची रक्कम क्लेम केली नसेल तर, त्यावर मिळणारा व्याजदर हा कमी होऊ शकतो. हे मिळणारे व्याज तुमच्या सेव्हिंग अकाऊंटवर जितकं व्याज मिळतं त्या व्याजाइतकं असणार आहे.
RBI ने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय की..
समजा, जर तुम्ही 5 वर्ष मॅच्योरिटी असलेल्या एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील आणि ती आज मॅच्युअर होणार असेल. तरीही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम/दावा केला नाही तर त्यावर तुम्हाला कमी व्याजदर मिळेल. हे सेव्हिंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजासमान असेल.
त्यामुळे एफडी मॅच्युअर (FD Maturity) झाल्यास लगेच क्लेम करा, नाहीतर पुढच्या कालावधीचे व्याज सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे सुरू होईल. याआधी एफडी मॅच्युअर झाल्यानंतरही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नसेल तर, तेवढ्याच अवधीसाठी ती पुढे वाढवली जात असे आणि तोच व्याजदर देखील मिळत असे. त्यामुळे यापुढे एफडी मॅच्युअर झाल्यावर लगेच क्लेम करा अन्यथा तुम्हाला व्याज कमी मिळू शकते.
सर्वसाधारणपणे 5 ते 10 वर्षाच्या दीर्घ अवधीसाठी एफडीवर जवळजवळ 5 टक्क्यांच्या आसपास व्याज मिळते. तर सेव्हिंग अकाऊंटवर व्याजदर हा साधारणतः 3 ते 4 टक्क्यांच्या जवळ असतो.
RBI चा जुना नियम कोणता?
यापूर्वी जेव्हा तुमची FD मॅच्युअर होत असे आणि समजा जर तुम्ही पैसे काढलेच नाही किंवा त्यावर दावा (FD Claim) केला नाही तर बँक तुमच्या FDचा कालावधी पुन्हा वाढते.
याचाच अर्थ असा की, तुम्ही 5 वर्षासाठी FD केली होती आणि तुम्ही पैसे काढलेच नाही तर बँक पुन्हा 5 वर्षासाठी FD वाढवायची परंतु आता याऐवजी आता सध्या नवीन नियमानुसार मॅच्युरिटीनंतर पैसे न काढल्यास त्यावर FD चं व्याजदर मिळणार नाही. त्यामुळे मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पैसे काढा आणि जर असं केलं नाही तर त्यासाठी होणारे आर्थिक नुकसान तुम्हाला सहन करावं लागेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews