SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

दुखापत झाली असतानाही ‘रोहित शर्मा’ने जिद्दीने फलंदाजी केली, वाचा नेमकं काय घडलं..

इंग्लंडविरुद्ध भारताच्या चौथ्या कसोटीत (India vs England 4th test 2021) शतक लगावणारा हिटमॅन रोहित शर्मा व अर्धशतक केलेल्या चेतेश्वराला चौथ्या दिवशी मैदानावर क्षेत्ररक्षणाला उतरता आले नाहीत. त्या दोघांऐवजी काल मैदानावर सूर्यकुमार यादव आणि मयांक अग्रवाल स्लीपमध्ये उभे राहिलेले दिसले.

BCCI ने याबाबत माहिती दिली आणि ते ऐकून चाहत्यांचं टेंशन वाढलं आहे. इंग्लंडच्या फास्ट गोलंदाजांचा मार आपल्या मांडीवर झेलत एक बाजू लढवत रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी इंग्लंडला भिडत होता. त्याला होणाऱ्या वेदनेची जाणीव करून देणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Advertisement

भारतीय संघाकडून या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मानं (Rohit Sharma) 127 व लोकेश राहुलने (Lokesh Rahul) 46 केल्या. यावेळी त्यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. मग चेतेश्वर पुजाराने मोलाच्या 61 धावा करत रोहितला साथ दिली. विराट कोहलीला पुन्हा एकदा शतकापासून वंचित रहावे लागले असले तरी त्याच्या आक्रमक 44 धावांच्या खेळीने टीम इंडियाची पकड चांगलीच मजबूत झाली.

चौथ्या दिवशी रिषभ पंत (50) व शार्दूल ठाकूर (60) यांनी धुलाई करत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यावेळी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या चेहऱ्यावरील हसू हिसकावण्यासारखी परिस्थिती झाली होती. मोईन अलीनं रिषभ पंतला बाद करण्याची सोपी संधी गमावल्यानंतर तर जो रूट तर डोक्यावरच हात मारून घेतला.

Advertisement

भारतीय संघाने चौथ्या कसोटीत निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार खेळानंतर रिषभ पंत व शार्दूल ठाकूर, विराट कोहली यांनी भारी योगदान देऊन टीम इंडियानं दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडसमोर विजयासाठी 368 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. दरम्यान, रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यात दुखापत झाली असून, पुजाराच्या पायाच्या घोटा दुखावत आहे. त्यामुळे त्यांनी विश्रांती घेतल्याची माहीती आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement