‘ओ शेठ! तुम्ही नादच केलाय थेट’ हे गायक उमेश गवळी यांच्या आवाजातील गाणं महाराष्ट्राला अजूनही वेड लावतंय. या गाण्याला आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी पाहिले आहे. एवढंच नाही, तर लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमात लोक या गाण्यावर थिरकत असताना दिसत असतात.
सध्या मात्र ओ शेठ या गाण्याच्या तालावर एका चिमुकल्याचे दुसरे मराठी गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून देशात लॉकडाऊन होता. तेव्हापासून मुलांच्या शाळा बंदच होत्या. यामुळे शाळकरी मुलांनी घरी राहून अनेक कला अवगत तर केल्याच पण काही मुलांनी तर सोशल मीडियावर प्रसिद्धीचीही लिमिटही तोडली.
कोरोनामुळे शाळा बंद झाल्यामुळे आपल्या शिक्षकांची चांगलीच आठवण झाली आहे. असाच एक व्हिडिओ आता फेसबुक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूबवर लोकांना वेड लावतोय ते म्हणजे हा छोटासा मुलगा ‘ओ सर नाही पडणार तुमचा विसर’ हे गाणं गाताना दिसत आहे.
गाण्याची काही झलक..
“कोरोनानं शाळा बंद हो झाली
आठवण तुमची लय हो आली
ओsss सर!
नाही पडणार तुमचा विसर
पाहा ‘ओ सर’ गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ:
AdvertisementView this post on InstagramAdvertisement
असे हा चिमुकला अगदी मजेदार पद्धतीने म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. ‘कोरोनानं शाळा बंद झाली. ऑनलाईन भरणारी शाळा, मात्र त्यात ऑफलाईन शाळेसारखी नसलेली मजा, हाती आलेला मोबाईल यावर विद्यार्थ्यानं गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं आहे. हा व्हायरल व्हिडीओ कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला फेसबुकवर ‘आईच्या गावात अन् 12 च्या भावात’ या मराठी पेजवर पाहिलं गेलं. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews