SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आधारकार्डबाबत मोठी बातमी, आता कार्डवर दिसणार नाहीत ‘या’ बाबी..! बदललेल्या नियमांबाबत जाणून घेण्यासाठी वाचा..

आधारकार्ड.. प्रत्येकाची ओळख दर्शविणारे महत्वाचे साधन. कोणत्याही कामासाठी आधारकार्ड वापरलेच जाते. मात्र, या आधारकार्डबाबत आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता आधार कार्डसंदर्भातील काही नियमांत बदल करण्यात आले आहेत.

आधारकार्डमध्ये काही बदल करण्याच्या विचारात असाल, तर त्याआधी ही बातमी वाचा.. कारण, नव्या नियमांनुसार, आधारकार्डमध्ये काही बदल करताना, आता तुमच्या वडिलांशी वा पतीशी असलेल्या नात्याची ओळख या कार्डमध्ये उघड केली जाणार नाही.

Advertisement

आधारकार्ड नातेसंबंध उघड करणारे कागदपत्रं नाही, तर ते फक्त तुम्हाला ओळखण्याचे एक साधन राहणार आहे. म्हणजेच, आता आधार कार्डमध्ये पती वा वडिलांचे नाव अनिवार्य असणार नाही.

कसे समोर आले..?
दिल्ली पोलिसांचे निवृत्त उपनिरीक्षक रणधीर सिंह यांनी त्यांच्या पत्नीच्या आधारकार्डवरील त्यांच्या घराचा पत्ता बदलण्यासाठी गेले होते. त्यांच्या पत्नीचे नवे आधारकार्ड तयार होऊन आले, तेव्हा त्यावर ‘वाइफ ऑफ’ ऐवजी ‘केअर ऑफ’मध्ये त्यांचे नाव होते.

Advertisement

सुरुवातीला त्यांना असे वाटले, की कॉम्प्युटर सिस्टीममधील काही अडचणीमुळे असे झाले असेल. त्यामुळे ते पुन्हा पत्नीचे आधारकार्ड बदलण्यासाठी पोस्ट ऑफिस, बँक आणि इतर अधिकृत केंद्रांवर गेले असता, तेथेही त्यांचे नाव ‘केअर ऑफ’मध्येच दिसत होते.

मुलाच्या आधारकार्डमध्येही बदल केला असता, वडिलांच्या नावासमोर ‘केअर ऑफ’ असेच येत होते. त्यानंतर त्यांना आधारकार्डच्या नियमांत बदल झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेय..?
२०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधारकार्डमधील बदलांबाबत सविस्तर निर्णय दिला होता. त्यात लोकांच्या गोपनीयतेबाबत चर्चा करण्यात आली. त्या आधारे केवळ आधारकार्डमध्ये नातेसंबंधांची माहिती दिली जात नसल्याचे समजले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी हा बदल कोणत्या वर्षाच्या कोणत्या महिन्यापासून सुरु करण्यात आला, याबाबतची माहिती भारतीय युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी (UIDAI) ने दिलेली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

आता पिता, मुलगा, मुलगी, पत्नी (वाइफ ऑफ, सन ऑफ, डॉटर ऑफ) त्याऐवजी ‘केअर ऑफ’ असे आधारकार्डवर छापले जात आहे. त्यामुळे आधारकार्ड बनविणेही अधिक सोपे झाल्याचे सांगण्यात आले.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement