SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सोलापूर-कोल्हापूर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले..! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

सोलापूर व कोल्हापूर परिसर शनिवारी (ता. 4) रात्री भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. भूकंपाचे धक्के बसत असल्याचे जाणवताच नागरिकांना घराबाहेर पळ काढला..

कोल्हापूर आणि परिसरात शनिवारी (ता. 4) रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा 3.9 रिश्टर स्केलचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरपासून सुमारे 18 किलोमीटर अंतरावरील कळे ते पूनाळ दरम्यानच्या शेतात असल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

जमिनीखाली तब्बल ३८ किलोमीटरवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपाची तीव्रता वा धक्का सौम्य असल्याने त्यात कुठलीही हानी झालेली नाही. वारणा येथील भूमापन केंद्र, तसेच कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही या भूकंपाची नोंद झाल्याचे समजते.

Advertisement

सोलापूरात भूकंपाचा अति सौम्य धक्का जाणवला. शनिवारी रात्री 11 वाजून 57 मिनिटांनी सोलापूर शहराच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपाचे धक्के सौम्या असल्याने काही भागांतील नागरिकांना ते जाणवलेही नाहीत.

भूमापन केंद्रावर भूकंपाची नोंद झाल्यावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष खडबडून जागे झाले. मात्र, यात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. कोयना धरणावरील भूमापन केंद्रावरही भूकंपाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

भूकंपाची तिव्रता अधिक नसली, तरी त्यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली होती. काहींना घराबाहेर धाव घेत, एकमेकांना भूकंपाची माहिती दिली.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement