SpreadIt News | Digital Newspaper

टीम इंडियावर कोसळले कोरोनाचे संकट, मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांच्यासह चौघे आयसोलेशनमध्ये..!

0

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आलेला असतानाच, टीम इंडियासाठी एक वाईट बातमी येऊन धडकली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

‘बीसीसीआय’च्या वैद्यकिय टीमने कोच रवी शास्री व त्यांच्या संपर्कात आलेल्या तिघांची रवानगी विलगीकरणात केली आहे. त्यात गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांचा समावेश आहे.

Advertisement

तिसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर टीम इंडियाने इंग्लंडवर १७१ धावांची आघाडी घेताना, सामन्यावर पकड मिळवली आहे. भारताच्या हातात ७ विकेट्स असून, इंग्लंडसमोर तगडे आव्हान उभे करण्याचे लक्ष्य टीम इंडियापुढे आहे. असे सगळे काही टीम इंडियाच्या बाजूने घडत असताना, मोठी बातमी आली.

टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांची काल (ता. 4) रात्री कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने संघात खळबळ उडाली.

Advertisement

रवी शास्री यांच्या संपर्कातील गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर व फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. आता या सर्वांची RT-PCR चाचणी केली जाणार आहे. तोपर्यंत ते सगळे हॉटेलमध्येच राहतील.

चौथ्या दिवसाचा खेळाला सुरवात
टीम इंडियासोबत त्यांना प्रवास करता येणार नाही. भारतीय संघातील अन्य सदस्यांच्या दोन चाचण्या झाल्या, त्यात सर्वांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आजच्या चौथ्या दिवसाचा खेळाला सुरवात झाली होती.

Advertisement

दरम्यान, रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांच्या १५३ धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडिया मोठ्या आघाडीच्या दिशेने निघाली आहे. कर्णधार विराट कोहली व रवींद्र जडेजा खेळपट्टीवर आहेत. अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ १३ षटकं आधीच थांबविण्यात आला होता.

दरम्यान, टीम इंडियावर कोरोनाचे संकट कोसळल्याने चौथ्या टेस्टवर अनिश्चिततेचे सावट आले होते. मात्र, इतर सर्वांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली होती. भारतीय संघ मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement