SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगातील सर्वात सुरक्षित शहरांची यादी जाहीर; भारतातील ‘या’ शहरांचाही समावेश..!

सध्याच्या काळात अनेकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जगभरात सातत्याने वाढणारा दहशतवाद, त्यात गुन्हेगारीचेही प्रमाण वाढले आहे. अशा काळात दोन घटका शांत, निवांत जगण्यासाठी प्रत्येकाची धडपड चाललेली आहे.

अशा धगधगत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ‘द इकोनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट’ने जगातील सर्वात सुरक्षित शहरांचा शोध घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं. त्याचा अहवाल नुकताच समोर आलाय. विशेष म्हणजे, त्यात भारतातीलही दोन शहरांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

जगभरातील ६० शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. सुरक्षित शहर निवडण्यासाठी ७६ निकषांची पुर्तता करण्याची अट होती. त्यात डिजीटल, हेल्थ, पायाभूत सुविधा, पर्यावरण आणि त्या शहरातील माणूस वैयक्तिकरित्या किती सुरक्षित आहे, या गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.

डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगन या शहराला १०० पैकी ८२.४ पॉइंट्स मिळून ते पहिल्या क्रमांकावर आले आहे. टोकीयो, सिंगापूरसारख्या शहरांना मागे टाकत, कोपेनहेगन शहर सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीत टाॅप आलेय. दुसऱ्या क्रमांकावर आहे, कॅनडाची राजधानी टोरंटो..!

Advertisement

टोरंटोला ८२.२ पॉइंट्स मिळाले. टोरंटो हे वैविध्यपूर्ण शहर असून, इथले जवळपास ३० लाख लोक हे १८० भाषा बोलतात. उन्हाळा आवडणाऱ्यांसाठी तर टोरंटो नंदनवन आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे, सिंगापूर.! या शहराची दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानी घसरण झालीय. कोरोनाचाही सिंगापूरला फटका बसला.

ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनी चौथ्या क्रमांकावर आहे. सिडनीला ८०.१ पॉइंट्स मिळाले. सिडनी हे जगातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असून, खाद्यप्रेमींसाठी येथे पर्वणी असते, तर पाचव्या क्रमांकावर जपानची राजधानी टोकीयो शहर आहे.

Advertisement

भारतातील या दोन शहरांचा समावेश
भारताची राजधानी दिल्लीसह मुंबईचे या यादीत नाव आहे. त्यात दिल्ली ६० पैकी ४८ व्या, तर मुंबई ५० व्या क्रमांकावर आहे. दिल्ली आणि मुंबईच्या मध्ये जोहान्सबर्ग आणि रियाध (49) ही दोन शहरे आहेत.

दिल्लीपेक्षा मुंबई जास्त सुरक्षित असल्याचे म्हटले जाते, मात्र वैयक्तिक सुरक्षेबाबत दिल्ली ५२.८ पॉइंट्ससह ४१व्या क्रमांकावर आहे, तर मुंबई ४८.२ पॉइंट्ससह ५०व्या क्रमांकावर असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement