SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘मनी हाईस्ट’मधील ‘बेला चाओ’ गाण्याचा अर्थ काय? जाणून घ्या..

नेटफ्लिक्स या OTT Platoform वरील अतिशय लोकप्रिय वेब सीरिज म्हणजे ‘मनी हाईस्ट’ (Money Heist) ही आहे. ही एक स्पॅनिश वेब सीरिज असून या वेब सीरिजला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजचा पाचवा सिझन दोन भागांमध्ये रिलीज होणार असून पहिल्या भागातील पाच एपिसोड 3 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत.

‘बेला चाओ’ गाण्याचा अर्थ काय?

Advertisement

‘मनी हाईस्ट’ची जादू भारतीय प्रेक्षकांवरही अलीकडे खूप पाहायला मिळते. यातील गाणं अतिशय लोकप्रिय झाल्याचं बघायला मिळतं. तरुणाईने गुगल सर्च करून सीरिजसोबतच सीरिजमधील ‘बेला चाओ’ (Bella Ciao Song) या गाण्याचा अर्थ शोधायला सुरुवात केली आहे. ‘बेला चाओ’ गाणं ‘मनी हाइस्ट’च्या पहिल्या सिझनमध्ये बँक ऑफ स्पेनच्या चोरीच्या दरम्यान तुम्हाला ऐकायला आल्यानंतर वेगवेगळ्या प्रसंगात जीव ओतण्याचं काम या गाण्याचं बॅकग्राउंड म्युझिक करतं.

अशी माहीती आहे की, उत्तर इटलीमध्ये गरीब महिलांना जबरदस्तीने कमी पगारात काम करायला लावायचे. त्यांच्याकडे कोणत्या ही प्रकारच्या सुविधा नव्हत्या. इटलीतील या महिलांना खूप त्रास, अत्याचार सहन करावे लागत होते, मग त्यांनी ‘बेला चाओ’ हे गाणं तयार केलं. या गाण्याचा अर्थ “खूप त्रास आहे, पण तो दिवस येईल जेव्हा आपण सर्वजण स्वातंत्र्यात काम करू” असा आहे. काही काळाने, ‘बेला चाओ’ हे इटालियन लोकगीत ठरलं आणि हे गाणे फॅसिस्ट लोकांच्या विरोधात जगभरात राष्ट्रगीत म्हणून गायलं जाऊ लागलं.

Advertisement

जगभरात प्रसिद्ध अशा नेटफ्लिक्सने ‘मनी हाईस्ट’च्या भारतीय फॅन्ससाठी ‘बेला चाओ’ या त्यांच्या एंथमचे देसी व्हर्जन तयार केलं गेलं आहे. या देशी व्हर्जन असणाऱ्या गाण्याला ‘जल्दी आओ’ असं नाव दिलं आहे. ‘बेला चाओ’ या गाण्याचे देसी व्हर्जनमध्ये भारतीय फॅन्स या सीरिजसाठी किती उत्सुक आहेत ते दाखवण्यात आले आहे. या सुपर हिट वेब सीरिज ‘मनी हाइस्ट’चा पाचवा आणि शेवटचा सिझन दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मनी हाईस्टबद्दल थोडक्यात..

Advertisement

▪️ पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये प्रोफेसर आणि त्याच्या गँगने रॉयल मिंट ऑफ स्पेनवर दरोडा टाकला होता.
▪️ तिसऱ्या आणि चौथ्या सिझनमध्ये बँक ऑफ स्पेनमध्ये सर्व सोनं वितळवून नेण्यासाठी गँगची धडपड सुरू असते.
चौथ्या सिजनच्या शेवटी अलेसिया सिअरा प्रोफेसरला शोधून पकडण्यात यशस्वी होते.
▪️आता पाचवा सिजनमध्ये बँकेत दरोडा टाकत असलेल्या गँगला आता स्वत:चं डोकं वापरावं लागणार आहे आणि त्यासाठी प्रती प्रोफेसर असलेली रकेल आता गँगसोबत आहे.

पाचव्या सिझनमध्ये अनेक रंजक ट्विस्ट असून त्याचा शेवट Tokyoच्या मृत्यूने झाल्याचं पहायला मिळतं. ‘टोकियो स्वार्थी आणि बेपर्वा होती. पण या सिझनमध्ये तिची एक वेगळीच बाजू पहायला मिळाली. यातील प्रोफेसरची भूमिका करणारा अल्वारो मोर्ते (alvaro morte) हा प्रचंड लोकप्रिय झाला. टोकियोच्या मृत्यूने चाहते निराश झाले असून सोशल मीडियावर त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement