SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘सीडी लावेल’ म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना ‘ईडी’चा दणका, ‘या’ प्रकरणात एक हजार पानी आरोपपत्र दाखल!

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे, (Eknath Khadase) त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीश चौधरी आणि अन्य दोन कंपन्यांविरोधात एक हजार पानी आरोपपत्र दाखल झाल्याने खडसे यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात ईडीने शुक्रवारी भोसरी (पुणे) जमीन गैरव्यवहार (Bhosari Land Scam) प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाशी संबंधित चौधरी यांना 7 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. खडसे कुटुंबाचे वकील, अधिवक्ता मोहन टेकवडे यांनी, ‘त्यांनी अद्याप आरोपपत्र पाहिले नाही आणि त्याचा अभ्यास केल्यानंतरच प्रतिक्रिया देऊ.”, असं म्हटलं आहे.

या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह इतर 2 जणांचाही समावेश असल्याचं कळतंय. या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी अटकेत असलेल्या गिरीश चौधरी यांचा जामीन अर्जही मुंबई सत्र न्यायालयानं शुक्रवारी फेटाळून लावला.

Advertisement

भूखंड खरेदीसाठी पैसे जमवल्याचा संशय..?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी भोसरीतील एमआयडीसी येथील जमीन 28 एप्रिल 2016 रोजी 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. मात्र, बाजारभावानुसार या जमिनीची किंमत 31 कोटी रुपयांच्या घरात आहे. या व्यवहाराखाली गिरीश यांनी पाच शेल कंपन्यांकडून आलेला पैसा वापरल्याचं कागदोपत्री निष्पन्न झालेलं आहे.

Advertisement

ईडीचा खटला महाराष्ट्र भ्रष्टाचारविरोधी ब्युरोने (एसीबी) 2017 मध्ये खडसे यांच्या विरोधात केलेल्या पहिल्या माहिती अहवालावर आधारित आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौधरी यांच्या जामिनाला विरोध केला. चौधरी यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाकडून निर्णय देण्याआधीच ‘ईडी’ने या प्रकरणी चौधरी आणि अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल (Chargesheet filed by ED against against Eknath Khadse, his wife and son-in-law) केले आहे.

ईडीची चौकशी सुरूच…..

Advertisement

एसीबीने नंतर हे प्रकरण बंद केले होते, परंतु ईडीने जमीन व्यवहारातील कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी सुरू ठेवली होती. गेल्या महिन्यात ईडीने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे आणि चौधरी यांची एकूण 5.73 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

ईडीच्या म्हणण्यानुसार, 2016 साली एकनाथ खडसे हे महसूल मंत्री असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत भोसरीतील त्या भूखंडाची मूळ किंमत कमी करून कमी दरात खरेदी केला. त्यामुळे सरकारी तिजोरीला 61.25 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीनं खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली होती.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement