SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय? शवविच्छेदन अहवालाविषयी पोलीस म्हणाले..

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) गुरूवारी सकाळी निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्यानं सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय?

Advertisement

डॉक्टरांनी सिद्धार्थचा पोस्टमार्टम रिपोर्ट (Sidharth Shukla Post-Mortem Report )पोलिसांना सोपवलेला आहे. या रिपोर्टमध्ये ना सिद्धार्थच्या मृत्यूचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. यात डॉक्टरांनी स्वत:चं मत नमूद केलं आहे. केमिकल एनालिसिस आणि हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टसाठी त्याचा व्हिसेरा राखून ठेवला आता या दोन रिपोर्टमधून सिध्दार्थच्या मृत्यूचे कारण नेमकं काय आहे.

सुरूवातीला डॉक्टरांनी सिद्धार्थचा मृत्यू हार्ट ॲटॅकनं झाल्याचं म्हटलं होतं. मात्र रिपोर्टमध्ये आणखी खुलासा व्हावा यासाठी केमिकल अ‍ॅनालिसीसची गरज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. केमिकल अ‍ॅनालिसीसनंतरच सिद्धार्थच्या शरीरात कोणतं विष तर नव्हतं किंवा मृत्यू अनैसर्गिक आहे का, हे समोर येईल. प्राथमिकदृष्ट्या तरी अनैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचे दिसत नसल्याची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये देण्यात आले आहे.

Advertisement

सिद्धार्थच्या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमेचे व्रण आढळून आलेले नाही. अंतर्गत जखमेचाही उल्लेख नाही. पाच डॉक्टरांच्या टीमने सिद्धार्थच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं. याची व्हिडीओग्राफी करण्यात आली. सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबियांनी कोणतीही शंका व्यक्त केली नाही.

आज सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Advertisement

सिद्धार्थ शुक्लाचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मकुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे.

40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला हा तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. त्याच्या आईच्या हट्टामुळेच त्याने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि नंतर अभिनय विश्वात पाऊल टाकले. सिद्धार्थ शुक्ल्याच्या अकाली निधनामुळे चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शोकाकुल चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement