बायकोसोबतच्या भांडणातून सुंदर पिचाई यांना सूचली ‘गुगल मॅप’ची कल्पना..! अॅपमागील रंजक किस्सा जाणून घेण्यासाठी वाचा..!
गुगल मॅप.. रोजच्या जगण्यातील एक महत्वाचे साधन.. प्रत्येकाला आपल्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाणारे अॅप..! जगाची खडा न् खडा माहिती असणाऱ्या या अॅपचा वापर प्रवासादरम्यान अनेक जण करतात. गुगल मॅपमुळेच कोणत्याही शहराच्या कोणत्याही कोपऱ्यातील पत्ता आपण सहज शोधू शकतो.
गुगल मॅपच्या निर्मिती कशी झाली, याची माहिती आहे का? ‘गुगल’चे (Google) मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना ही कल्पना सुचली होती. मात्र, त्यामागे खूपच रंजक किस्सा आहे. चला तर मग, लोकांना इतके फायदेशीर ठरणारे हे अॅप नेमकं कसे तयार झाले, हे जाणून घेऊ या..
अशी झाली ‘गुगल मॅप’च्या निर्मिती
ही गोष्ट आहे 2004 सालची.. सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील त्यांच्या जवळच्या मित्राने जेवणासाठी घरी बोलाविले होते. पिचाई यांना त्यांच्या बायको अंजलीसोबत मित्राच्या घरी जायचे होते. मात्र, सुंदर पिचाई हे ऑफिसमध्ये होते. त्यावर त्यांनी एक प्लॅन बनविला.
सुंदर पिचाई यांनी बायकोला घरुन थेट मित्राच्या घरी पोचण्यास सांगितले. त्याच वेळी तेही ऑफिसमधून थेट मित्राच्या घरी पोचणार होते. जेवणाचा कार्यक्रम रात्री 8 वाजता होता. त्यानुसार सुंदर पिचाई यांच्या पत्नी अंजली त्यांच्या कारने बरोबर रात्री आठ वाजता पोहोचल्या.
सुंदर पिचाई हेही ऑफिसमधून बाहेर पडले, पण ते रस्ता चुकले. मित्राच्या घरी जाईपर्यंत रात्रीचे 10 वाजले होते. पिचाई यांना उशीर झाल्याने त्यांची पत्नी निघून गेली होती.
सुंदर पिचाई हेही तेथून लगेच त्यांच्या घरी परतले. त्यांना पाहताच बायकोच्या रागाचा पारा चढला. अंजली यांनी त्यांच्याशी जोरदार भांडण सुरू केले. ते वेळेवर न आल्याने कार्यक्रमात त्यांचा अपमान झाल्यासारखे त्यांना वाटले. बायकोचा बिघडलेला मूड पाहून पिचाई यांनी पुन्हा ऑफिसला गाठले.
ऑफिसमध्येच त्यांनी संपूर्ण रात्र घालवली. रस्ता चुकल्याची हुरहूर त्यांना लागली होती. मी अशा प्रकारे रस्ता चुकत असेन, तर रोज बरेच लोकही रस्ता चुकत असतील, असा विचार त्यांच्या मनात आला. रात्रभर विचार करताना त्यांच्या लक्षात आले, की नकाशा खिशात असता, आपण रस्ता चुकलाे नसताे.
सुंदर पिचाई यांनी दुसऱ्या दिवशी सकाळीच टीमला बोलावून नकाशाची संकल्पना मांडली. सुरवातीला काही लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. मात्र, नंतर पिचाई यांनी लोकांना रस्ता दाखविणाऱ्या उत्पादनाची गरज असल्याचे पटवून दिले.
अखेर गुगल मॅपचे लाॅंचिंग
सुंदर पिचाई व त्यांच्या टीमच्या मेहनतीतून 2005 मध्ये अखेर ‘गुगल मॅप’चे अमेरिकेत लाँचिंग झाले. पुढे 2006 मध्ये इंग्लंडमध्ये, 2008 मध्ये भारतातही गुगल मॅप सुरु झाले. संपूर्ण जगाला आता हे मॅप योग्य मार्ग दाखविते. एका आकडेवारीनुसार, जगातील प्रत्येक सातवी व्यक्ती गुगल मॅप वापरत असल्याचे समोर आलेय.