केंद्र सरकारने नवीन प्राप्ती कर नियमावली जारी केली आहे. याअंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. केंद्र सरकारने नवीन आयकर नियमावली अधिसूचित केली आहे ज्या अंतर्गत विद्यमान भविष्य निधी खाती (PF) दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील.
अधिसूचनेनुसार, पीएफवरील व्याज मोजण्यासाठी पीएफ खात्यातच एक वेगळे खाते उघडले जाईल. नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जातील. या बदलासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटीनं प्राप्तीकर नियमावली 1962 मध्ये बदल केला असून त्याठिकाणी एक नवा नियम 9D जोडला आहे.
CBDT अधिसूचनेनुसार 31 मार्च 2021 पर्यंत कर लावला जाणार नाही. परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल. तर पीएफ खात्यात आर्थिक वर्ष 2021-22 आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये भविष्य निर्वाह निधी खात्यातच दोन स्वतंत्र खाती असतील.
नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील, परंतु 2021-22 आर्थिक वर्षापर्यंत, जर खात्यात वार्षिक ठेव 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल. पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात लोकांना या व्याजाची माहिती द्यावी लागेल.
याआधीही PF रकमेवरच्या व्याजावर कर लावण्याचा प्रस्ताव ?
देशात सध्या जवळपास सहा कोटी पीएफ खाती आहेत. 93 टक्के लोकांवर याचा काहीही परिणाम होणार नाही. कारण त्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम या मर्यादेपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना सध्या कराची चिंता करण्याची गरज नाही. 2016 मध्येही अर्थसंकल्पात याबाबतचा एक प्रस्ताव आला होता. निवृत्तीनंतर जेव्हा कर्मचारी पीएफची रक्कम काढतात त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रकमेच्या व्याजावर कर लावायला हवा, असा प्रस्ताव होता. त्यानंतर या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तो प्रस्ताव मागे घेतला होता. लोकसभेमध्ये निवेदन करून त्यांनी हा प्रस्ताव मागे घेत असल्याचे स्पष्ट केले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews