SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

जेईई मेन परीक्षेत मोठा घोटाळा; सीबीआयचे पुणे, दिल्लीसह 20 ठिकाणी छापे!

सीबीआयने इंजिनिअरिंग प्रवेश परीक्षा JEE Main मध्ये घोटाळा झाल्याचं उघड केलं आहे. या प्रकरणात सात जणांना अटक केली असल्याची माहीती आहे. याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करत सीबीआयने दिल्ली, एनसीआर, पुणे, बेंगळुरू, जमशेदपूर आणि इंदूरसह एकूण 20 ठिकाणी छापे टाकले आहेत.

12 ते 15 लाख रुपये उकळले?

Advertisement

JEE-Main पूर्वी CBSE द्वारे घेतली जात होती, परंतु सध्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ही परीक्षा घेते. दरवर्षी सुमारे 10 लाख उमेदवार जेईई-मेन परीक्षेला बसतात. NIT सारख्या प्रमुख संस्थांमध्ये नाव नोंदवण्यासाठी अनेक एजंट राज्याराज्यांत विखुरलेले होते. ही टोळी 12 ते 15 लाख रुपये घेत होती. सीबीआयने या प्रकरणी 1 सप्टेंबरला एफआयआर दाखल केली होती. पण छापे मारण्यासाठी जेईई मेनच्या चौथ्या टप्प्यातील परीक्षा संपण्यासाठी सीबीआय थांबली होती.

CBI च्या माहितीनुसार, नोएडातील एफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड संस्थेच्या संचालकांनी जेईई मेन परीक्षेत रँकिंग मिळवून देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा तयार केली असल्याचं सांगितलं जातंय. त्यांचे एजंट जेईई मेन परीक्षेत कमी रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली रँकिंग आणि एनआयटी सारख्या प्रमुख संस्थेत नाव नोंदणीचं आश्वासन देत होते.

Advertisement

विद्यार्थ्यांची 10 वी आणि 12 वीची मूळ प्रमाणपत्रं, जेईई मेनचा युजर आयडी आणि पासवर्ड आपल्याकडे ठेवून घेत होते. पूर्ण पैसे मिळाल्यावरच ती परत केली जात होती. 1 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर दिल्ली, NCR, पुणे, जमशेदपुरमध्ये 20 ठिकाणी छापा मारण्यात आला. CBI ने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीच्या संचालक, तीन कर्मचारी आणि इतर खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या मदतीने गैरकारभार होता चालू

Advertisement

महाराष्ट्र आणि कर्नाटकसह इतर राज्यांमधील अनेक विद्यार्थी जेईई मेनसाठी सोनीपतचे परीक्षा केंद्र निवडत होते. विद्यार्थ्यांना हे परीक्षा केंद्र निवडण्यास सांगितलं जात होतं, अशी माहिती सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. परीक्षा केंद्रातील सामील असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने संबंधित विद्यार्थ्याच्या कंप्युटरचा रिमोट कंट्रोल घेऊन ते दूर कुठेतरी बसलेल्या एका व्यक्तीला द्यायचे. आणि ती व्यक्ती त्या विद्यार्थ्याच्या सर्व प्रश्नांची उत्तर देत होता. सीबीआयने छाप्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांसह सात पीसी आणि 25 लॅपटॉप जप्त केले आहेत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement