SpreadIt News | Digital Newspaper

शिक्षक भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, थेट मुलाखतीद्वारे भरणार इतक्या जागा, शिक्षणमंत्र्यांनी काय म्हटलेय पाहा..?

0

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरु लागल्याने राज्य सरकारने आता नोकरभरतीवर लक्ष दिले आहे. राज्यातील विविध विभागांतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात अनेक दिवसांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीलाही मुहुर्त मिळाल्याने राज्यातील पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार, अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाने टप्प्याटप्प्याने या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून, त्यात पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहे.

Advertisement

शिक्षण विभागातर्फे सध्या 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलीय.

शिक्षणमंत्र्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय..?
शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खासगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंती क्रमानुसार 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा..!”

Advertisement

राज्यातील 6100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती शिक्षणमंत्री गायकवाड यांनी 8 जुलै रोजी दिली होती. राज्य सरकारच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था / खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकभरती होणार आहे.

Advertisement

तसेच अनुदानास पात्र प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदे टप्प्याटप्प्याने भरली जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आदिवासी समाजातील पात्र विद्यार्थ्यांनी 23 ऑगस्टला पालघर जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले होते.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement