SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अश्विनला पुन्हा बाकावर बसविल्याने पत्नी संतापली..! विराट कोहलीने दिलेय त्यामागील कारण..!

भारत विरुद्ध इंग्लंडमधील चौथ्या कसोटीला ओव्हल मैदानावर आजपासून (ता. 2) सुरवात झाली. इंग्लंडने टाॅस जिंकून भारताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. इंग्लंडच्या स्विंग बाॅलिंगसमोर भारताची पहिल्या डावात घसरगुंडी उडाली. अवघ्या 122 धावांत भारताने आघाडीचे 6 बॅटसमन गमावले होते.

दरम्यान, या कसोटीत भारताने मोहम्मद शमी व ईशांत शर्मा यांना दुखापतीमुळे संघातून वगळले. चौथ्या कसोटीत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळणार असल्याचे संकेत कर्णधार विराट कोहली यानं दिले होते. त्यात तिसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजाला दुखापत झाली होती.

Advertisement

किमान या कसोटीत तरी भारताचा नंबर वन स्पीनर आर. अश्विन याला संधी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, कॅप्टन कोहलीने पुन्हा एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष करताना शमी व इशांतच्या जागेवर शार्दूल ठाकूर व उमेश यादव यांना संधी दिली. त्यामुळे अश्विनवर पुन्हा एकदा बाकावर बसण्याची वेळ आली.

Advertisement

विराटने या टेस्टमध्येही अश्विनला न खेळविल्याने सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केलेय. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन, ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न यांनीही कोहलीचा हा निर्णय चुकल्याची प्रतिक्रिया दिली.

टेस्टमधील दुसऱ्या क्रमांकावरील अश्विनला सलग चार सामने बाकावर बसविल्याने त्याची पत्नी प्रीतीनेही नाराजी व्यक्त केली. प्रीतीने एक पोस्ट केली असून, त्यात त्यांची मुलगी दुर्बिणीतून काहीतरी शोधत आहे. त्यावर प्रीतीनं कमेंट लिहिली, की आर. अश्विनला शोधतेय…

Advertisement

विराटने सांगितले कारण..
आर. अश्विनला टीममध्ये संधी न देण्यामागील कारण विराटने सांगितले. तो म्हणाला, की इंग्लंडकडे चार डावखुरे बॅटसमन असल्याने जाडेजाला संधी दिली. त्याचा मदतीला चार वेगवान बाॅलर आहेत. टाॅस जिंकून आपणही प्रथम बाॅलिंगचा निर्णय घेतला असता.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement