SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतातील पर्यटनासाठी सर्वात सुंदर, नयनरम्य अशी पाच ठिकाणं, जी तुम्हाला नक्की आवडतील..

भारत म्हणजे अनेक तऱ्हेच्या वैशिट्यपूर्ण गोष्टींनी भरलेला देश आहे. ज्यात विविधता असूनही लोकांमध्ये एकता आहे. भारत हा प्राचीन इतिहास असणारा देश आहे. भारत संस्कृतीसाठी प्रामुख्याने जास्त ओळखला जातो. यंदा कोरोनामुळे कुठे जाता येत नसेल, तरी आपण फक्त सध्या अशी काही सुंदर ठिकाणे पाहून ठेवू म्हणजे जेव्हा कधी प्लॅन होईल, तेव्हा नक्कीच तुम्ही या ठिकाणी पर्यटनास (Tourism) जावं. येथे तुम्हाला सर्व प्रकारचे लोक त्यांची वेगळी संस्कृती, चालीरीती इत्यादी दिसेल. भारत त्याच्या रंगीबेरंगी विविधतेने कोणालाही आकर्षित करू शकतो.

भारतातील आकर्षक 5 ठिकाणे:

Advertisement

1) अमृतसर

Advertisement

भारतात पंजाबमधील अमृतसर (Amritsar City in Punjab) शहर हे शीख संस्कृतीचे केंद्र आहे तर पंजाब म्हटलं की लस्सी आणि पराठा आपल्या डोळ्यासमोर येतात. आपण शाळेत असताना पाठ्यपुस्तकात अमृतसरमधील सुवर्ण मंदिराचे फोटो पाहिलेच असतील. जालियनवाला बाग आणि वाघा बॉर्डर हे देखील तेथील पर्यटनस्थळं आहेत. अमृतसरच्या या सुवर्ण मंदिरासारख्या पवित्र स्थळावर तुम्ही शांत बसुन तुमचं मन शांत ठेवू शकता. शांतता अनुभवू शकता. दुसरीकडे, वाघा बॉर्डरमुळे तुम्हाला हवेत उर्जा जाणवेल आणि तुम्हाला थंडपणा मिळेल. याशिवाय शहरातील खाद्यपदार्थ, स्वादिष्ट लस्सी, अमृतसरी मासे, छोले भटुरे, आणि सुवर्ण मंदिर लंगरमध्ये शहराची संस्कृती स्पष्टपणे दिसून येते.

2) कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगाल राज्यामधील कोलकाता (Kolkata City in West Bengal) हे गुलाबजामुन, रसगुल्ले व इतर काही गोड पदार्थांमुळे मिठाईचं माहेरघर आपण समजू शकतो. प्राचीन काळातील संस्कृतीमुळे कोलकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. ब्रिटिशांच्या खूप प्रभावाव्यतिरिक्त येथील समृद्ध साहित्यासाठी देखील हे शहर ओळखलं जातं. समजा तुम्ही जर कधी कोलकातामध्ये गेलाच तर व्हिक्टोरिया मेमोरियल, सायन्स सिटी, हावडा ब्रिज अशा फेमस ठिकाणी जाणं आवश्यक आहे. अशा सुंदर ठिकाणी कोलकात्यातील दुर्गा पूजा हा एक मोठ्या उत्सवासारखा पार पडत असतो.

Advertisement

3) म्हैसूर

Advertisement

कर्नाटक राज्यात वसलेले म्हैसूर (Mysore) नावाचे ऐतिहासिक वारसा असलेले शहर हे कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणून लोकप्रिय आहे. म्हैसूरमध्ये तुम्ही गेलात तर म्हैसूर पॅलेस, ललिता महल, चामुंडी हिलटॉप अशा मंदिरांना नक्की भेट द्या. विजयनगर साम्राज्याचे आर्किटेक्चर चालुक्य, होयसला, पांड्या व चोल शैलीचे एक जिवंत मिश्रण आहे.

4) लखनऊ

Advertisement

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ म्हणजे नवाबांचे शहर अशीही या शहराला ओळख आहे. हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या संपूर्ण विलीनीकरणाचा वारसा तुम्हाला येथे अनुभवायला मिळेल, यासाठी लखनऊला भेट देणं महत्वाचं ठरतं. लखनऊ (Lucknow City in Uttar Pradesh) या शहराची कला, साहित्य वाखाणण्याजोगे आहे. लखनऊच्या प्राचीन वास्तुकलेवर दिल्ली सल्तनत, मुघल, नवाब तसेच इंग्रजांचा प्रभाव दिसतो. याठिकाणी अस्सल मुघल पाककृती सुंदर आहे. जेव्हा तुम्ही लखनऊमध्ये असता, तेव्हा तुम्ही बडा इमामवाडा, रुमी दरवाजा, ब्रिटिश रेसिडेन्सी कॉम्प्लेक्ससारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्यायलाच हवी.

Advertisement

5) राजस्थान

Advertisement

राजस्थान (Rajasthan) हे प्राचीन राजवाडे, किल्ले यांचा वारसा दाखवणारे राज्य आहे. ड्रेसिंग सेन्सपासून ते घरांच्या एकसारख्या रंगांपर्यंत आणि ओसाड वाळवंटात, या राज्यात अनुभवण्यासारख्या अनेक उत्तम गोष्टी आहेत. येथील संस्कृतीने परिपूर्ण असलेल्या राज्याचा अनुभव घेण्यासाठी, तुम्हाला येथे पुन्हा पुन्हा भेट द्यावी लागेल. तुम्हाला येथे राजा-महाराजांचे वाडे किल्ले पहायला मिळतात. फिरायचं म्हटलं की, खाण्यावर ताव मारणं आलंच, त्यासाठी राजस्थानमधील ढाबस येथे तुम्ही दाल बाटी चुरमा खाऊ शकता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement