SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग: बालिका वधू व बिग बॉस फेम अभिनेत्याचं निधन, मृत्यूचं नेमकं कारण काय?

लोकप्रिय अभिनेता आणि बिग बॉस 13 चा विजेता (Bigg Boss Winner) सिध्दार्थ शुक्लाचं (Actor Siddharth Shukla) गुरूवारी निधन झालं आहे. सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनानंतर सर्वांनच धक्का बसला असून चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिद्धार्थचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती सगळीकडे पसरत आहे. आज सकाळी त्याला कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सिद्धार्थचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थने आपल्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं आभार मानलं होतं.

Advertisement

डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थचा मृतदेह (Sidharth Shukla Died) कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला, अद्याप हे सांगणे कठीण आहे. मात्र त्याच्या शरिरावर कोणतीह बाह्य जखम नाही आहे. सिद्धार्थ शुक्लाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल आणि शवविच्छेदन अहवालानंतर त्याचप्रमाणे सिद्धार्थसह राहणाऱ्यांचा जबाब नोंदवला जाईल, त्यानंतर यावर स्पष्ट काही सांगता येईल. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सिद्धार्थचा प्रवास कसा घडला..?

Advertisement

मुंबईत 12 डिसेंबर 1980 मध्ये मुंबईमध्ये जन्मलेल्या सिद्धार्थने 2008 मध्ये ‘बाबूल का आँगन छुटे ना’ या मालिकेतून पदार्पण केलं. त्याचं शिक्षण सेंट झेव्हियर्स कॉलेजमध्ये झालं. त्याने रचना संसद महाविद्यालयातून इंटेरियर डिझाईन विषयात पदवी घेतली होती.

2004 साली त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं; प्रचंड लोकप्रिय आवडती ‘बालिका वधू’ या मालिकेने त्याला खरी ओळख मिळवून दिली होती. ‘बालिका वधू’ या मालिकेतून त्याने अनेकांची मने जिंकली होती. या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती.

Advertisement

फेमस रिॲलिटी शो बिग बॉस 13 मध्ये सहभाग घेतला होता आणि त्या सिझनचा तो विजेताही ठरला होता. त्यानंतर त्याने खतरों के खिलाडी या शोच्या सातव्या सिझनमध्येही सहभाग घेतला होता. अभिनयाबरोबरच त्याने अनेक शोजचं निवेदनही केलं. ‘इंडियाज गॉट टँलेट’ या शोचं भारती सिंग बरोबर निवेदन केलं होतं. ‘सावधान इंडिया’ या शोचं निवेदन त्याने केलं होतं.

आलिया भट्ट आणि वरुण धवन यांच्या ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनीया’ या सिनेमातही सिद्धार्थ झळकला होता. 2017च्या ‘लव्ह यू जिंदगी’ या चित्रपटातही तो झळकला होता. बिग बॉस 13 मध्ये सिद्धार्थ आणि त्याची मैत्रीण शहनाझ गिल यांची जोडी सुपरहीट ठरली होती.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement