SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तालिबानने कब्जा करताच अफगाणिस्तानात ‘या’ चार शब्दांचं महत्त्व वाढलं, त्यांचा नेमका अर्थ काय?

अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर कब्जा मिळवत तालिबानने लोकनियुक्त सरकारला उलथवून टाकत शस्त्रांच्या जोरावर सत्ता काबिज केलीय. मात्र, या सत्तांतरानंतर लगेचच अफगाणिस्तानमधील शासन व्यवस्थेत काही शब्दांना प्रचंड महत्त्व आलंय.

अफगाणिस्तानचं भविष्य अंधारात जाताना काही शब्द आपल्या कानावर नक्कीच पडले असतील, ज्या शब्दांमुळे तालिबानच्या कायदे-कानून याविषयी आपल्याला माहीती मिळते. आता हे शब्द आणि त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे.

Advertisement

तालिबानचे ते शब्द कोणते आणि अर्थ काय वाचा..

इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान:

Advertisement

तालिबानने सत्ता मिळवल्यानंतर लगेचच अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिराती ऑफ अफगाणिस्तान’ असं तालिबनने करण्यात आल्याची चर्चा सगळीकडेच झाली आहे. अमिरात हा शब्द अमीरपासून बनलाय. अमीर म्हणजे प्रमुख असा त्याचा अर्थ होतो.

शरिया

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच राज्य आल्यावर अधिक चर्चा पसरली ती शरिया नावाच्या शब्दाची. शरिया या अरबी शब्दाचा अर्थ धार्मिक कायद्यानुसार ‘वर्तन’ आहे. तालिबानने अफगाणिस्तान मुस्लीम कायद्यानुसार म्हणजेच कुराण आणि हदिसमध्ये सांगितल्याप्रमाणे चालेल असं घोषित केलंय. सौदी अरब शरियाप्रमाणेच काम करतो.

मुजाहिद:

Advertisement

अनेक दहशतवादी कारवायांमध्ये आपण मुजाहिद किंवा मुजाहिदीन हा शब्द नेहमीच ऐकतो. तर हा शब्द नेहमीच तालिबानी दहशतवाद्यांसाठी वापरला जात असतो. हा शब्द अरबी आहे. हा शब्द जोहद पासून बनला आहे. जोहद म्हणजे प्रयत्न करत राहणारा असा आहे. जे त्यांच्या धर्माचा प्रसार करतात व सातत्याने प्रयत्न करत राहतात त्यांना मुजाहिद म्हटलं जात असल्याची माहीती आहे.. याचा दुसरा अर्थ न्याय पोहचवणारा असाही होतो. अनेक दहशतवादी, कट्टरतावादी स्वतःला मुजाहिदीन म्हणून घेत असतात.

शुरा:

Advertisement

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं कसं सरकार असेल याबाबत ‘शुरा’ केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, तालिबानने अलीकडेच म्हटलं आहे. त्यामुळे शुरा शब्दाचं महत्त्व अधिक वाढलं. सल्लामसलत करून निर्णय घेणे, या शुराचा अर्थ आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement