SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची!; अन्यथा शाळांना ‘इतका’ दंड; सुधारित शासन निर्णय जारी

राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा आणि खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या, व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या शाळांमध्ये 5 वी ते 10 वी इयत्तेपर्यंत मराठी भाषा ही सक्तीचीच करण्यात आली आहे.

राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतचा कायदा राज्याने विधिमंडळात पारित केला होता. मराठी भाषा शिकविण्यास उत्सुक नसलेल्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE), भारतीय माध्यमिक शिक्षण परिषद (ICSE), आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (IB), केंब्रिज मंडळाच्या अनेक शाळांनी पळवाटा शोधत मराठी भाषा विषय शिकवण्यास टाळाटाळ केली होती. याबाबतच्या तक्रारी आल्याने शालेय शिक्षण विभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे.

Advertisement

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचा आदेश

इयत्ता 5वी ते 10वी या इयत्तांसाठी मराठी भाषेचा वापर करताना अनेक खाजगी शाळांनी यातून पळवाटा काढल्यामुळे आता आधीच्या आदेशात बदल करून द्वितीय भाषेचा दर्जा देताना ‘सक्ती’ हा शब्द वापरून सुधारित आदेश जारी केला आहे. त्यामुळे शाळांमध्ये आता मराठी भाषा ही आता सक्तीची असणार आहे. भले तिला द्वितीय भाषेचा दर्जा देवो, पण मराठी भाषेचा वापर आता शाळांमध्ये करावा लागणार आहे.

Advertisement

सुधारित आदेशाची अंमलबजावणी न केल्यास…

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या जीआरमुळे राज्यातील सर्व खासगी इंग्रजी, हिंदी व अन्य भाषिक शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य होणार आहे. राज्यात अनेक शाळा बालभारतीची पुस्तके वापरत नाहीत, मराठी शिकवीत नाहीत, मराठीसाठी मराठी शिक्षकांना रुजू करून घेत नाहीत, अशा एकातरी शाळेवर शिक्षण विभागाकडून कारवाई का झाली नाही. मराठी विषय सक्तीच्या या कायद्याच्या तरतुदीचे शाळांनी उल्लंघन केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे, असा प्रश्न मराठी शाळा संस्थाचालक संघाचे समन्वयक सुशील शेजुळे यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement

शासनाच्या निर्णयाचं स्वागत…!

महाराष्ट्रातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयात मराठीला मानाचं स्थान असंल पाहिजे, अशी भूमिका भाषाप्रेमींनी घेतली आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी हा निर्णय नक्कीच उपयोगी ठरेल. मराठी भाषा ही ज्ञान संपन्न भाषा असल्याची जाणीव शाळा आणि महाविद्यालयांना असलं पाहिजे, अशी भूमिका देखील भाषा प्रेमींनी घेतली आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement