SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

7 कोटी रुपये जिंकता जिंकता राहिले, तुम्हाला येतंय का कौन बनेगा करोडपतीमधील ‘या’ प्रश्नाचं उत्तर…?

सध्या सोनी टीव्हीवर ‘कौन बनेगा करोड़पती’ (Kaun Banega Crorepati Season 13) चे 13वे पर्व सुरु असून या रिॲलिटी शोची वेगळीच चर्चा मागील काही दिवसांपासून चालु आहे. KBC या रिॲलिटी शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचा स्ट्रगल या कार्यक्रमाला वेगळ्याच वळणावर घेऊन जात आहे.

आता या कार्यक्रमात एक अशी स्पर्धक आली होती, जिने अनेक आव्हानांचा सामना करून, अंधत्वावर मात करत डोळस कामगिरी केली आणि भल्याभल्य़ांना लाजवलं. या हिमानी यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत.

Advertisement

या पर्वात एवढी मोठी रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत. मात्र तिने 1 कोटी रुपये घेऊन गेम क्वीट करण्याचा निर्णय घेतला. ‘आपण एवढ्या पैशांचं काय करणार याचा कधी विचारच केला नव्हता’, असंही हिमानीने सांगितलं. ‘अमिताभ यांच्यासमोर बसणं हेच आपल्यासाठी स्वप्न होतं’, असंही तिने सांगितलं आहे.

अलीकडेच प्रसारित झालेल्या एका भागात हिमानी बुंदेला नावाच्या या स्पर्धकानं 50 लाख रुपये जिंकले होते. स्पर्धेत सगळ्या लाईफलाईन तिने वापरल्या वापरल्या आणि नव्या दिवशी तिने या स्पर्धेमध्ये जबरदस्त कमाल करत तब्बल 1 कोटी रुपये जिंकले.

Advertisement

1 कोटी रुपयांसाठी प्रश्न:

📌 प्रश्न: दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खान हीने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?

Advertisement

A) वेरा एटकिस
B) क्रिस्टीना स्कारबेक
C) जुलीएन आईस्त्रर
D) जीन-मेरी रेनियर

👉 उत्तर: D) जीन-मेरी रेनियर असं या प्रश्नाचं उत्तर होतं.

Advertisement

पण, यानंतर पुढे तिला 7 कोटींचा पल्ला गाठता आला नाही. सर्व लाईफलाईन वापरल्यावर हिमानी बुंदेलाला बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1 कोटी रुपयांसाठीचा एक प्रश्न विचारला होता, त्या प्रश्नाचं तिनं अगदी योग्य उत्तर दिलं. पण पुढे 7 कोटी रुपयांच्या बक्षीसासाठी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला.

7 कोटी रुपयांसाठीचा तो प्रश्न कोणता?

Advertisement

📌 प्रश्न: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्समध्ये सादर केलेल्या प्रबंधाचं (Thesis) शीर्षक काय होतं ज्यासाठी त्यांना 1923 साली डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली?

A) द वॉण्ट्स अ‍ॅण्ड मीन्स ऑफ इंडिया
B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी
C) नॅशनल डिव्हिडंट ऑफ इंडिया
D) द लॉ अ‍ॅण्ड लॉयर्स

Advertisement

👉 उत्तर: B) द प्रॉब्लेम ऑफ द रुपी असं या प्रश्नाचं उत्तर होतं.

आता पुढं असं झालं की, हिमानीला या प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं मग तिने स्पर्धेतून माघार घेतली आणि आपला स्पर्धेतील प्रवास थांबवला आणि तिथंच अजून एका स्वप्नाच्या आशा संपुष्टात आल्या. असं असलं तरी हिमानी ही केबीसीमधील आतापर्यंतची पहिली दृष्टीहीन स्पर्धक आहे. तिच्या या अफाट जिद्दीला सगळीकडूनच सलाम ठोकला जात आहे.

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews

Advertisement