SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सरकारी शाळा होणार आदर्श शाळा, ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, किती खर्च करणार, वाचा..!

राज्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने ४८८ सरकारी शाळांचे रुपांतर आदर्श शाळांमध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी राज्य सरकार पहिल्या टप्प्यात ४९४ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यात विकसित केल्या जाणाऱ्या या आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास करण्यावर लक्ष दिले जाणार आहे. त्यात नवनिर्मितीला चालना, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक प्रवृत्ती-संविधानिक मुल्ये अंगी बाणविणे, संभाषण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Advertisement

सरकारी शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यात स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीतील वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, ICT लॅब, सायन्स लॅब, ग्रंथालय यांसारख्या सुविधांचा समावेश असणार आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी उत्तम शैक्षणिक पोषक वातावरण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्रंथालयांत पूरक वाचनाची पुस्तके, संदर्भग्रंथ, इनसायक्लोपिडिया उपलब्ध असतील. स्वअध्ययनासह गट अध्ययनासारखे रचनात्मक पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रमही राबविले जाणार आहेत.

Advertisement

राज्यातील शाळांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी राज्य सरकार आदर्श शाळा उभारणार आहे. समग्र शिक्षा अभियानामार्फत आदर्श शाळांचे बांधकाम करण्यात येईल. त्यासाठी 100 कोटींचा निधी ई-गव्हर्नंसच्या निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले.

अशी होणार शाळांची निवड..?
आदर्श शाळांची निवड काही निकषांवर केली जाणार आहे. त्यात आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्गखोल्या, मुलां-मुलींकरीता स्वतंत्र स्वच्छतागृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष, शैक्षणिक-खेळाचे साहित्य असावे.

Advertisement

ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, व्हर्च्युअल क्लास रूमची सुविधा, विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील उपलब्धता, विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता या निकषांवर शाळांची निवड होणार आहे.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement

 

Advertisement