SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

हृतिक-कतरिनाच्या जाहिरातीवरुन वाद..! ‘झोमॅटो’ला द्यावं लागलं स्पष्टीकरण, नेमकं काय झालं पाहा..

‘झोमॅटो’.. नागरिकांना घरपोच फूड डिलिव्हरी करणारी कंपनी.. हाॅटेलमध्ये न जाता नागरिकांना घरबसल्या हाॅटेलमधील खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येतो. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक कंपनी आपल्या ब्रॅंडची जाहीरात करीत असते. झाेमॅटोची अशाच एक जाहीरातीवरुन सध्या वाद निर्माण झालाय.

अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांना घेऊन झोमॅटोने जाहीराती बनविल्या होत्या. मात्र, त्या आता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या जाहिराती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत. त्यावरून ऋतिक-कतरिना दोघांनाही ट्रोल करण्यात येतंय.

Advertisement

जाहिरातीत दाखविलेल्या डिलिव्हरी पार्टनरसोबत चुकीचं वर्तवणूक केल्याचा आरोप होतोय. सोशल मीडियातून केल्या जाणाऱ्या टिकेमुळे हा वाद वाढण्याआधीच ‘झोमॅटो’ कंपनीने पुढे येऊन त्यावर आपले स्पष्टीकरण दिल आहे.

काय आहे जाहिरतीत..?
जाहिरातीत डिलीवरी पार्टनर ऋतिक रोशनच्या घरची डोअरबेल वाजवतो. दार उघडल्यावर ऋतिक त्याला ‘जादू’ असे म्हणत त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी थांबवितो. फोन घेण्यासाठी तो परत आत जातो.

Advertisement

फोन घेऊन येईपर्यंत डिलिवरी बाॅयला दुसरी ऑर्डर आल्याने तो निघून जातो. अशीच काहीसी जाहीरात कटरिना कैफसोबतही करण्यात आलेली आहे. ऋतिक, कटरिना असो वा कोणीही, आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक स्टार आहे, असा मेसेज झाेमॅटोने जाहिरातीतून दिला आहे.

Advertisement

मात्र, या जाहिरातीवरुन वाद निर्माण झालाय. डिलिव्हरी पार्टनर कडक डेडलाईन पाळत सेवा देतात. केवळ ३० सेकंद एका सेल्फीसाठी ते थांबू शकत नाहीत का? असा सवाल एकाने उपस्थित केलाय.

प्रसिद्धीसाठी बाॅलिवूड स्टारवर पाण्यासारखा खर्च केला, दुसरीकडे डिलीव्हरी बाॅयचे कंपनी शोषण करीत असल्याचा आरोप होत आहे.

Advertisement

‘झोमॅटो’चे स्पष्टीकरण..
जाहीरातीमुळे वाद वाढण्यापूर्वीच ‘झोमॅटो’ कंपनीने ट्विटर अकाउंटवर स्पष्टीकरण दिलंय. त्यात म्हटलंय, की जाहिरातीत डिलिव्हरी बाॅयला हिरो दाखविण्याचा उद्देश होता. एका चांगल्या उद्देशाने सहा महिन्यांपूर्वीच ही जाहीरात बनविली होती. त्यावेळी डिलिव्हरी पार्टनरच्या वेतनाचा विषयही सुरू झालेला नव्हता.

Advertisement

ऋतिक व कतरिना ज्या पद्धतीने डिलिव्हरी बॉयसोबत वागले, तसंच लोकांनीही त्यांना वागणूक द्यावी, या हेतूने ही जाहिरात बनविली आहे. लोकांनी या जाहिरातीला चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे स्पष्टीकरण दिलंय.

“झोमॅटोसाठी प्रत्येक ग्राहक स्टार आहे. आमच्या डिलिव्हरी पार्टनरचं प्रमोटर स्कोर १० ते २८ टक्क्यांनी वाढलं आहे. तसंच आम्ही एक ब्लॉगदेखील पोस्ट करण्याच्या विचारात असल्याचे ‘झोमॅटो’ने म्हटलं आहे.

Advertisement

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉https://cutt.ly/allnews

Advertisement