SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी टेंडर काढले..! ‘या’ उद्याेगपतींच्या नावांची चर्चा..

इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल.. जगातील सर्वाधिक लोकप्रिय लिग.. जगभरातील क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळण्यासाठी आसुसलेले असतात. या लिगमधून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने ‘बीसीसीआय’साठी ही स्पर्धा म्हणजे, सोन्याचे अंडी देणारी कोंबडी बनली आहे.

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात ८ संघ खेळत आहेत. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आता या स्पर्धेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आयपीएलच्या पुढील पर्वात, म्हणजेच 2022 मध्ये या लीगमध्ये ८ ऐवजी १० संघ खेळताना दिसणार आहेत.

Advertisement

आयपीएलमध्ये यापूर्वीही 10 संघ खेळले आहेत. मात्र, काही कारणानिमित्त ‘गुजरात लायन्स’ व ‘कोची टस्कर्स’ या संघांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर, म्हणजेच २०११ पासून आयपीएलमध्ये 8 संघच खेळत होते. मात्र, आता या स्पर्धेत पुन्हा एकदा दोन नव्या संघांचा समावेश करण्यात येणार आहे.

‘या’ उद्योगपतींची नावे चर्चेत
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल-२०२२ साठी दोन नव्या संघांचा समावेश करण्यासाठी टेंडर मागविले आहेत. अदानी ग्रूप, RPG संजीव गोएंका ग्रूप, टोरेंट फार्मा कंपनी यांची नावे त्यासाठी चर्चेत आहेत. या टेंडरसाठी ५ सप्टेंबरपूर्वी अर्ज करावा लागणार आहे.

Advertisement

नव्या संघांची मूळ किंमत १७०० कोटी असेल, असा विचार सुरू होता, परंतु आता ती २००० कोटी रुपये केली आहे. ‘बीसीसीआय’ला प्रत्येक नवा संघ ३ ते ३५०० कोटींना विकला जाण्याची अपेक्षा आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी १० लाख रुपये भरावे लागतील. हे पैसे परत केले जाणार नाहीत.

लिलावात सहभागी होण्यासाठी अटी
वार्षिक टर्नओव्हर ३००० कोटी रुपये असणाऱ्या कंपनीलाच या लिलावात सहभागी होता येणार आहे. तसेच, एक संघ खरेदी करण्यासाठी तीनपेक्षा अधिक कंपन्यांना एकत्र येता येणार नाही. अहमदाबाद, लखनऊ व पुणे या तीन नव्या शहरांच्या नावांनी हे नवे संघ असतील, अशीही चर्चा आहे.

Advertisement

अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडियम, तर लखनऊ येथेही मोठे स्टेडियम असून, या दोन्ही स्टेडियमची प्रेक्षक क्षमता अधिक आहे. इच्छुकांना [email protected] या मेलवर ई-मेल करून लिलावात सहभागी होता येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार असल्याचे बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात म्हटलेय.

🎯 भारताला WhatsApp वर न्यूज/जॉब्स/माहिती-मनोरंजन पुरवणारे ‘स्प्रेडइट’ Free जॉईन करा अणि मिळवा संधी iPhone10 जिंकण्याची, त्यासाठी क्लिक करा आणि स्प्रेडइट नंबर सेव्ह करा 👉 https://cutt.ly/allnews

Advertisement