फेरीवाल्याने चाकूने हल्ला करत महिला सरकारी अधिकाऱ्याला जखमी केल्याची घटना ठाण्यामध्ये घडली आहे. ठाणे महापालिकेच्या माजीवडा प्रभागाच्या सहायक आयुक्तांवर (Attack on woman assistant commissioner in Thane) प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी कल्पिता पिंपळे यांना आपली दोन बोटं गमवावी लागली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा विभागाच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) या काल सोमवारी कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत होत्या. या मुख्य मार्केटमध्ये सायंकाळी 6.30 च्या सुमारास ही कारवाई सुरू होती.
सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर तेव्हा एका फेरीवाल्याने काल सोमवारी संध्याकाळी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली आहे, तर डोक्यालाही देखील गंभीर दुखापत झाली आहे.
त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावले असतानाच रागाच्या भरात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर त्याने चाकू हल्ला केला. ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून पिंपळे यांच्यावर चाकूने अचानक हल्ला झाल्याची माहीती आहे.
याप्रसंगी या हल्ल्यात बचावासाठी कल्पिता पिंपळे यांनी हात वर केल्यावर त्यांची दोन बोटेच तुटून पडली होती. त्यांचा बचाव करण्यासाठी धावलेल्या अंगरक्षकाचं एक बोट तुटलं आहे. त्यानंतर त्यांना तातडीने वेदांत रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर तेथून ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
हल्ल्याचं कारण काय?
कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या अमरजित यादव या फेरीवाल्याला स्थानिक नागरिक आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु, पोलीस आपल्याला पकडण्यासाठी पुढे येत असल्याचे समजताच त्याने तोच चाकू त्याने स्वतःच्या गळ्यावर ठेवून त्यांना पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला. काही वेळ हे थरारनाट्य चालले, मग त्याला शिताफीने पकडून कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याची गाडी जप्त केल्यानेच राग मनात धरून त्याने हा हल्ला केला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎯 तमाम महाराष्ट्राला व्हॉट्सॲपवर न्यूज अपडेट्स पुरवणारे ‘स्प्रेडइट – डिजिटल न्यूजपेपर’ नक्की जॉईन करा 👉https://cutt.ly/impnews